नेहरू युवा केंद्रातर्फे बोदवड ब्लॉकचे विकास वाघ आणि विजयेंद्र पालवे या स्वयंसेवकांचा या कार्यात सहभाग
बोदवड – आत्मसन्मान फाउंडेशनच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळात गरजुंपर्यंत दैनंदिन जीवनात लागणार्या जिवनावश्यक खाद्य अन्नाचे वितरण करण्यात आले. कोरोणा विषाणू च्या प्रार्दुभावामुळे शासनाने सर्विकडे बंदचे आदेश काढले आहे. अशा काळात जे मोलमजुरी करून आपले जिवन जगत असतात. त्यांनी या काळात कसं जगावं. याचा विचार करून नांदगाव येथील आत्मसन्मान फाउंडेशनच्या वतीने गावोगावी जाऊन गरजुंपर्यंत किराणा वाटपाचे काम हाती घेण्यात आले आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे बोदवड ब्लॉकचे विकास वाघ आणि विजयेंद्र पालवे या स्वयंसेवकानी या कार्यात सहभागी होऊन सहकार्य केले .