विरोदा(किरण पाटील)- आज फैजपुर पो.स्टे. हद्दीतील कासवे शिवारात तापी नदी काठी, गैरकायदा गावठी हातभट्टी दारू गळण्याची भट्टी रचून दारू गाळीत असतांना गूळ मोह, नवसागर मिश्रित कच्चे रसायन, भट्टीचे साधने व तयार दारू सह आरोपी संजय कोळी हा मिळुन आल्याने त्याचेवर छापा टाकून त्यांचेकडून ५०, ५००/- रू किंमतीची गावठी हातभट्टी दारू चे कच्चे रसायन व तयार दारू व भट्टीचे साधने जप्त करण्यात आले आहे. सदरबाबत दारूबंदी कायदा क ६५(फ)(ब)(इ) तसेच भा.द.वि.क १८८, २७० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर ची धाड ए. पी.आय. प्रकाश वानखडे अंबादास पाथरवट, हेमंत सांगळे, गोकुळ तायडे, सुधाकर पाटील, किरण चाटे, उमेश सानप या पोलिसांनी टाकली.