<
मुंबई-(सुशीलकुमार सावळे) -पालघर येथे अत्यंत निघृणपणे सुहासिलगिरी महाराज, कल्पगिरी महाराज व चालक नितेश तेलगडे या तिघांची हत्या करण्यात आली परंतु सरकारतर्फेव कोणीही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही आणि आर्थिक मदत हि देण्यात आलेली नाही. चालक निलेश तेलंगडेच्या दोन लहान मुली आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणीही कमावते नसल्याने आमदार अतुल भातखजलकर यांनी १ लाख रुपयाची मदत केली आहे. परंतु ती पुरेशी नसल्याने सरकारकडून त्यांना आर्थिक साहाय्य करून न्याय द्यावा आणि झालेल्या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी तातडीने पूर्ण करावी व हा संपूर्ण खटला विशेष न्यायालयात जलद गतीने चालवून या करिता सरकारच्या वतीने उज्वल निकम यांच्यासारख्या प्रतिष्ठित वकिलाची नेमणूक करावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांना केली आहे.
सुशीलगिरी महाराज व त्यांचा मठ व त्यांच्यासोबत गेलेला चालक निलेश हे कांदिवली पूर्व मतदारसंघात राहत होते. आमदार भातखळकर यांनी निलेश यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि मठाला भेट देऊन मठाच्या आगामी व्यवस्थेबाबत सुद्धा उपस्थित नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असताना सुशीलगिरी महाराजांचे गुरुबंधू यांचे सुरत येथे देहावसान झाल्यामुळे त्याठिकाणी जाण्याकरिता पोलीस परवानगी करिता ते प्रयत्न करत होते. गुरुबंधुंचा मृत्यू झाला असताना पोलिसांनी त्यांना आवश्यक त्या परवानग्या का दिल्या नाहीत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे. त्याचबरोबर ज्या गावात हि घटना घडली त्या गावामधील जे कोणी लोक या घटनेच्या मागे होते त्यांची जात, पाट, धर्म न पाहता सखोल चौकशी करून त्यांना शासन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. निलेश तेलगडे हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याला ५ वर्ष व ७ वर्ष अशा दोन लहान मुली आहेत या दोन्ही लहान मुलींची व त्यांच्या कुटुंबाची आगामी काळाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी अशी हि मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.
आमदार भातखळकर यांनी निलेशच्या घरी जाऊन रु. १ लाखाचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केला. ज्याजोगे येणाऱ्या काळामध्ये त्याच्या कुटुंबियांना काही ना काही आर्थिक मदत या माध्यमातून होईल. त्याचबरोबर मतदारसंघातील लोकांना सुद्धा त्यांनी आवाहन केले आहे कि, अत्यंत दुर्दैवी आणि विनाकारण मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम कांदिवली पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते हे आगामी काळात करतील. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असताना, या संदर्भातील कारवाई करत असताना राज्य सरकारने अक्षम्य असे ४८ तास वाया घालवले असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना हि घटना घडल्यानंतरच काही तासातच आमदार भातखळकर यांनी विडिओ पाठवला होता आणि त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांना या तपासापासून पूर्णपणे दूर ठेवावे आणि तरच हि चौकशी निष्पक्ष आणि खऱ्या अर्थाने वेगवान होईल अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.