<
(सिमाबंदी) आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल तसेच तपासणी नाक्यावरील कर्तव्यात कसुर केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी
जळगांव(प्रतिनिधी)- राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादृर्भाव होवु नये, याकरीता शासन स्तरावर मोठया प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअनुषांने देशात तसेच राज्यात लॉक-डाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणुन जळगाव जिल्हयातील बॉर्डर वर विशेष पथके नेमण्यात आलेले आहेत. सदरचे पथके हे सतत २४ तास हजर राहुन लॉक-डाऊन चे अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध (सिमाबंदी) आदेशाचे उल्लंघन करऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. चाळीसगाव शहरातील सुलतान अजीज खान वय – २४ धंदा – पेन्टींग रा.प्लॉट नं.८, काका निवास शेजारी, पवारवाडी चाळीसगाव हा दोन महीण्यापुर्वी सायने तालुका मालेगाव येथे घराचे पेन्टींग कामाकरीता गेला होता त्यावेळी लॉक डाऊनमुळे तेथील काम बंद झाल्याने तो चाळीसगाव येथे परत आला. पुन्हा कामाचे पैसे बाकी असल्याने दिनांक 7एप्रिल रोजी चाळीसगाव येथुन त्याचे मोटार सायकलने सायने तालुका मालेगाव येथे गेला लॉक-डाऊन चालु असल्याने तो मालेगाव येथे त्याचे नातेवाईक यांचे कडे राहीला होता. आज दिनांक २१ रोजी सकाळी त्याचे जवळील मोटार सायकलीने मालेगाव मधील नुराणी नगर येथुन निघुन चाळीसगाव चौफुली – दहीवाळ – गिरणाडॅम फाटा – कलवाडी – पिलखोड मार्गे येथे आला तेथुन टाकळी – आडगाव – देवळी – बिलाखेड व चाळीसगाव येथे प्रवास करीत येवुन चाळीसगाव येथील पवारवाडीतील त्याचे घरी पोहचला. सुलतान अजीज खान याने लॉक-डाऊन मध्ये नियमाचे उल्लंघन केल्याने त्याचे विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याची वैदयकीय तपासणी करुन त्याचे डावे हातावर कोरोटाईनचा शिक्का मारण्यात येवुन त्यास होम कोरोटाईन करण्यात आले आहे. तरी जळगाव जिल्यातील नागरिकांना जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की, जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्हयातुन निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात आले असुन जे कोणी सिमाबंदी आदेशाचे पालन करणार नाहीत त्याचे विरुध्द (१) आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ , (२) भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ (३) Indian Penal Code – १८६२ या कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सुलतान अजीज खान हा ज्या मार्गेने आला त्या मार्गेवरील पोलीस तपासणी नाक्यावरील कर्तव्यावर असलेले संबंधीत पोलीस अधिकारी कर्मचारी यांची संखोल चौकशी करुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.