<
जळगांव(प्रतिनिधी)- आज नाशिक येथे उच्च शिक्षण घेत असलेला रावेर येथील रुपेश पाटील या विद्यार्थ्यांने त्याच्या रूम मध्ये गळ फास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या चे कारण असे की लॉकडाऊन मुळे जिल्हाबंधी असल्यामुळे त्याला घरी यायला परवानगी न भेटल्यामुळे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे असे कोणतेही चुकीचे पाउल उचलू नका. मदत लागल्यास संपर्क करा तुम्हाला मदत पोहोचवली जाईल. थोडी वाट बघा, हा काळ सर्व देशासाठी संकटपूर्ण आहे. आणि अश्या काळात जर आपण विद्यार्थी वर्गाने जोकी आपल्या देशाचे भविष्य आहे हवेच जर हिंमत सोडली तर आपण बाकीच्या कडून काय अपेक्षा करायची?आपली भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ज्यांनी आपल्याला कोणत्या परिस्थितीत कस राहून त्याला कस सामोरे जायचे हे शिकवले. राज्यसरकार त्यांना शक्य असेल ते करत आहे आम्ही पण आम्हाला शक्य असेल ते मदत करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी संपर्क केला त्यांना मदत आम्ही पोहोचवली आहे आणि अजून प्रयत्न करत आहोत. पण जर तुम्ही आमच्या पर्यंत मदतीचा हाक मारणार नाही तर आम्हाला कस समजेल? सर्व विद्यार्थी वर्गाला एक विनंती आहे, कोणतेही चुकीचं पाऊल उचलू नका आणि आम्हाला किंवा राज्य सरकारला संपर्क करा तुमचे खायचे, राहायचे, मेडिकल, परीक्षासंबंधित, काही समस्या सर्व सोडवल्या जातील. तुम्ही कुठे अडकलेले असला तर तिथेच थांबा आमच्याशी संपर्क करा आम्ही तेथील स्थानिक कार्यालयाशी संपर्क करून तुम्हास मदत पोहोचवू. तसेच काही अडचण असल्यास खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी युवासेना अंकित कासार,
रुपेश महाजन जिल्हाअध्यक्ष विर भगतसिंग विद्यार्थी परिषद जळगांव, रोहन महाजन जिल्हाअध्यक्ष, महाराष्ट्र स्टुडंट युनियन जळगाव, भूषण धनगर जिल्हाअध्यक्ष, सत्यशोधक विद्यार्थी संघटना,जळगांव, हर्षवर्धन खैरनार
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, जळगांव 8421517133, 8329457943, 8623077871, 9049588826, 77700 31705, 89567 47378 अशी विनंती यावेळी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली.