Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांची मदत

जिल्ह्यात आतापर्यंत ४७ लाखांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.२३- येथील सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी म्हणजेच ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रूपयांचा मदत निधी दिला असून याचा धनादेश आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तीक पातळीपासून ते विविध व्यापारी, उद्योजक, सामाजिक संस्था, सहकारी संस्था आदींनी मदत करण्याचे आवाहन केले असून याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने ५ लाखांची मदत केली. यानंतर धरणगावच्या नगरपरिषदेनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत प्रदान केली. यानंतर आता सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी अर्थात, ग.स. सोसायटीनेही ११ लाखांचा निधी दिलेला आहे.

ग.स. सोसायटीचे चेअरमन मनोज पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांचेकडे ११ लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान केला. याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील पाटील, संचालक तुकाराम बोरोले, विलास नेरकर, एन.एस. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ना. गुलाबराव पाटील यांनी ग.स. सोसायटीच्या दातृत्वाचे कौतुक केले.

दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जिल्ह्यातून आजवर ४७ लाख रूपयांची मदत देण्यात आलेली आहे. समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी यात आपापल्या परीने भर टाकावी. याच्या जोडीला सामाजिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आदींनीही सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतराचे पालन करावे

Next Post

संतांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी-श्याम चैतन्य महाराज

Next Post
संतांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी-श्याम चैतन्य महाराज

संतांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी-श्याम चैतन्य महाराज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo