<
ठाणे-मुलुंड (दिनांक – 23 एप्रिल) – भारतामध्ये कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून लॉकडाउन पाळण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर इतर सर्व उदयोगधंदे व कामं बंद आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करून किंवा छोटे मोठे उद्योग करून आपल्या परिवाराचा गाडा ओढणाऱ्या वर्गाला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. सरकारमार्फत राशनकार्ड वर धान्य तर दिले जात आहे पण ते राशन कार्ड असेल त्यांनाच पण ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अथवा जे उदरनिर्वाहासाठी इतर राज्यामध्ये स्थळांतरीत झाले आहेत अशा मजूर वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे.
मुलुंड इंदिरा नगर परिसरात कोरोना पॉझिटिव पेशंट सापडले होते त्यामुळे त्याठिकाणी येणारा मदतीचा ओघ सुद्धा कमी होता पण मुलुंड येथील योगेश जाधव, मोहन प्रसाद व इतर सहकारी यांनी सामाजिक बंधीलकीचे भान ठेवून गरजू व्यक्तींची माहिती काढली व सादर अहवाल संस्थेला सादर केला. रिपरिवर्तन फाउंडेशन चे उपाध्यक्ष सुशीलकुमार सावळे व भांडुप, मुलुंड येथील सहकारी यांनी स्वतःची काळजी घेत गरजू व्यक्तीपर्यंत इंदिरा नगर, मुलुंड पश्चिम विभागामध्ये अन्न धान्याचे किट (गहू, तांदूळ, साखर, तेल, चहापत्ती, मसाले) वाटप करण्यात आले. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षा वैशाली मॅडम, उपाध्यक्ष सुशीलकुमार सावळे, भांडुपचे सहकारी विकास वानखेडे तसेच मुलुंड येथील सहकारी योगेश जाधव, मोहन प्रसाद, सुनील प्रसाद, राजेश चौधरी, नागेश शर्मा व इतर सहकारी यांचा देखील सुद्धा मोलाचा वाटा आहे.