<
जळगाव : शहरातील युवाशक्ती फाउंडेशनतर्फे महिन्याभरात सुमारे 65 हजार गरजूंना भोजन वाटप करण्यात आले आहे. या कार्यासाठी अनेक दानशूरांचे हात लागले असून भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे.
लोकडाऊन घोषित व्हायच्या आधी 23 जानेवारीपासून आज महिन्याभरात सुमारे 65 हजार जेवणाची पाकिटे वाटप करण्यात आली आहेत. सुरुवातीला आलेला प्रतिसाद पाहता नंतर तो वाढत गेला. सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी 1 हजार 700 असे 3 हजार 400 व्यक्तींना भोजन पुरविले जाते आहे.
निमखेडी शिवार, कासमवाडी, समता नगर, शिवाजी नगर, पिंपराळा हुडको, शाहू नगर, जेलच्या पाठीमागील विवेकानंद नगर, रामेश्वर कॉलनी, मेहरुन परिसर झोपडपट्टी, रायपूर कंडारी , सिद्धार्थ नगर, धनाजी काळे नगर, राजीव गांधी नगर, बळीराम पेठ, शामराव नगर, जुना असोदा रोड, दूध फेडरेशन एरिया यासह राधाकृष्ण मंगल व लाडवंजारी मंगल कार्यालय येथे फूड पॅकेट देण्यात आली आहेत. स्वयंपाकी वासुदेव पाटील कुठलीही मजुरी न घेता जेवण तयार करून देत आहेत.
मदतकार्य करीता युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, पियुष हसवाल, पियुष तिवारी, प्रीतम शिंदे, गोकुळ बारी, राहुल चव्हाण, अर्जुन भारुळे, उमाकांत जाधव, अमोल गोपाळ, गणेश भोई, संदीप सूर्यवंशी, प्रशांत गायकवाड, संदीप तायडे, रघुनाथ राठोड, मनजीत जंगीड, मनोज चव्हाण, पवन चव्हाण, राकेश बडोले, नवल गोपाळ आदी परिश्रम घेत आहेत.