<
एरंडोल (प्रतिनिधी) -तालुक्यात दुष्काळी अनुदान व बोंड अळीचे 33 टक्के कपात केलेली रक्कम परत मिळावी या प्रमुख मागण्यांसह इतर जनहिताच्या मागण्यांसाठी आमदार डॉक्टर सतीश पाटील हे आपल्या समर्थकांसह 5 ऑगस्ट पासून येथे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत .
यासंदर्भात त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहे.याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण कर्ज माफी संदर्भात शेतकर्यांना सहकारी बँकेकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवीन वीज मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ बंद करावी याही मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.