<
सध्या आपल्या देश्यातच नव्हे तर संपूर्ण जगात,कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातली आहे.याचा वाढता प्रादुर्भाव पाहून या रोगाला नियंत्रनात आणण्यासाठी भारत सरकारने,या देशात सर्वत्रच लॉकडाऊन केले आहे.
अश्यातच, काही लोक वेग वेगळ्या ठिकाणी इतर राज्यात काम करण्यासाठी,विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जिथे होते, तिथेच अडकून बसली आहेत. लॉकडाऊन मुळे
त्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात जाता येत नाही…!
आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत सुद्धा असेच घडले आहे. आपल्या येथील 85 ते 90 विद्यार्थी, विद्यार्थिनी, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालिंधर. पंजाब, येथे अडकले आहेत.
त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आपापल्या घरी परत यायचे आहे.त्यांच्या परिवाराला सुद्धा त्या विद्यार्थ्यांची काळजी वाटत आहे.
यातील एक विद्यार्थी म्हणजे प्रसाद कुमार खेडेकर रा.कर्जत जिल्हा.अहमदनगर येथील विद्यार्थी असून तो तेथील युनिव्हर्सिटी मध्ये पी.एच.डी. करत आहे. या विद्यार्थ्यांने कोल्हापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या उपाध्यक्षा साखरे ताई, यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर साखरे ताई यांनी ही सर्व माहिती रविकांत वर्पे यांच्याकडे पाठवली. मग तेथील युनिव्हर्सिटी च्या एका प्रमुख विद्यार्थ्याशी रविकांत वर्पे यांचे बोलणे झाले.
त्यानंतर रविकांत वर्पे यांनी तेथील सर्व घटनेचा आढावा घेऊन, पंजाब येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, आणि तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांना कोऑर्डीनेट करायला सांगितले…!
त्यानंतर रविकांत वर्पे यांनी, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय, जयंत पाटील साहेब यांना पत्राद्वारे या सर्व घटनेची माहिती दिली. त्यांना त्या 90 मुलांच्या नावाची यादी सुद्धा पाठवीली.
ही सर्व माहिती दिल्या नंतर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, माननीय,अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात, या सर्व वरिष्ठांची एक मीटिंग झाली, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पंजाब चे मुख्यसचिव यांच्या दोघांमध्ये संवाद होऊन,
ते सगळे विद्यार्थी आता या काही दिवसा मध्ये महाराष्ट्रात परत येत आहेत. महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांना त्यांच्या पास ची व्यवस्था सुद्धा करून देण्यात आली आहे…!
या मध्ये विशेष प्रयत्न जयंत पाटील साहेब व रविकांत वर्पे साहेब यांनी केले आहे…!
व तसेच
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
महाविकस आघाडी…! या सर्वांचे जाहीर आभार…