<
जळगांव(प्रतिनिधी)- जगभरात धुमाकूळ घालत असलेले कोरोनाचे संकट देशात धडकले आणि देशासह राज्य सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून 3 मे पर्यंत लॉकडाऊन केले. देशातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने 23 मार्च पासून रेल्वे, बस, खाजगी वाहने हे संपूर्ण बंद केले आहे. यामुळे शिक्षणासाठी मुंबई-पुण्यात गेलेले विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. मुंबई-पुण्यातील लाॅकडाऊन कधी संपेल याचा अंदाजा नाही. त्यांच्या खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे, त्यांचे पालक चिंतेत आहेत, आता असं किती दिवस मुंबई- पुण्यात अडकून पडायचे. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन ते आत्महत्या सारख्या भयानक पर्याय अवलंबत आहे. त्यांची आरोग्य तपासणी करा, चांगले असले तर गावाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी भावूक हाक एका पालकाने शासनाला मारली आहे.
अनेक बातम्या ऐकल्या कोटा मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले नांदेड येथे गुरुद्वारा मध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवले. महाराष्ट्रात अडकलेल्या यूपीच्या कामगारांना नेण्यासाठी आदित्यनाथ योगी काहीतरी प्लॅनिंग करीत आहेत. पण अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रातच काही विद्यार्थी काही व्यक्ती आपल्या घरापासून लांब अडकलेले आहेत. असे विद्यार्थी घरापासून लांब अडकल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे तरी राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी काही प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे अडकलेले विद्यार्थी त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्यापासून आपण वाचवू शकाल अशी विनंती पालकाने राज्य सरकारकडे केली आहे.