<
विरोदा(किरण पाटील)- फैजपूर – सावदा याठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात कोरोना केअर सेंटर साठी धनाजी नाना महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह ताब्यात घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी १४ बेडची व्यवस्था करण्यात असल्याची माहिती. फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. या ठिकाणची पाहणी शुक्रवार दि.२४ रोजी करण्यात आली. यावेळी यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी किशोर चव्हाण व यावल बी.डी.ओ. डॉ.निलेश पाटील आदी उपस्थित होते. त्याच प्रमाणे कोरोना केअर सेंटर (कोविड -१९) विरूध्द च्या लढा देणे साठी वसंतराव विष्णू पाटील औदयोगिक वसाहतीचे चेअरमन मनोजकुमार वसंतराव पाटील यांनी श्री विष्णू हरी ॲन्ड श्रीमती. लक्ष्मीबाई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, सावदा, संचलित लक्ष्मी-विष्णू हाॅल हा सदर उपक्रमा साठी पाटील परिवारा तर्फे विनामुल्य उपलब्ध करून प्रांताधिकारी डाॅ.अजीत थोरबोले व सावदा नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे ताब्यात देणेचे जाहीर केले आहे. दरम्यान सावदा, फैजपूर, या ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. सावदा येथील हाजी इमदाद अली पेट्रोल पंपाचे मालक यांनी ३०० गाद्या आणि एक हाॅल उपलब्ध करून दिला आहे. कोरोना केअर सेंटर सुरू करण्याकरिता समाजातील विविध दानशूर, सामाजिक कार्यकर्ते, संघटना व संस्था यांनी आप आपल्या परिने या लोकाभिमुख कार्यासाठी तत्पर मदत शक्य होईल, त्या स्वरूपात द्यावी, तसेच मदतीचा हात पुढे करून शासनाला मदत करावी, आणि कोरोना युध्दात विजय मिळविण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य करावे. प्रत्येक नागरिकाने कोरोना केअर सेंटर सुरू करण्याकरिता देश व समाज कार्यासाठी मोलाचा वाटा उचलावा. असे जाहीर आव्हान प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले फैजपूर यांनी केले.