सिने जगत

अनेक दक्षिण भारतीय सिनेमांत काम करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने तिचे लेटेस्ट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले असून, तिचा हा नवीन लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे.

या फोटोजमध्ये रकुल प्रीत ने डीप नेकलाईन असलेला लाल रंगाचा ड्रेस व त्यावर लाल रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे. साजेसा मेकअप व साधे इअररिंग्ज या लूक ला अधिक खास बनवत आहेत.

रकुल प्रीत च्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच तिचे ‘माशुका’ हे गाणे प्रदर्शित झालेले आहे तसेच तिने अनेक मोठमोठे बॉलीवूड प्रोजेक्ट्सही हाती घेतलेले आहेत.










