Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

RSS सरसंघचालक मोहन भागवत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी विदेशी मीडियाशी साधणार संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत हे या (सप्टेंबर) महिन्याच्या सरतेशेवटी विदेशी मीडियाशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून पाकिस्तान (Pakistan) वगळून 70 देशाच्या मीडिया कर्मचाऱ्यांना याकरिता आमंत्रण देण्यात आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार हा एक ऑफ कॅमेरा कार्यक्रम असेल म्हणजेच यामध्ये पत्रकार परिषदेच्या स्वरूपात प्रक्षेपण केले जाणार नाही. यावेळी भागवत संघाचे मूळ उद्दिष्ट, पोशाख व विचारसरणी मागील कल्पना विदेशी मीडियाला समजावून सांगतील. अशाप्रकारे पहिल्यांदाच संघाकडून विदेशी मीडियाशी संवाद साधला जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार,सप्टेंबरच्या शेवटच्या काही दिवसात आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये ही बैठक आयोजित करण्यात येईल. यावेळी भागवत यांच्याहस्ते बैठकीचे उद्घाटन व पुढे त्यांचे भाषण व त्याला जोडून प्रश्नउत्तर सत्र घेण्यात येईल. विविध मुद्द्यांवर संघाचा पवित्रा कसा आहे, त्यापाठीमागे काय विचारसरणी आहे हे जागतिक मीडियाला समजावणे हा यामागील मुख्य हेतू असणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून संघाबाबतचे जे गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करण्यासाठीच हा संवाद साधला जाणार असे देखील संघातर्फे सांगण्यात येत आहे.

दरम्यान कार्यक्रमाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मागील वर्षी सप्टेंबर मध्ये सुद्धा आरेसेसतर्फे मोहन भागवत यांनी तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये भारतीय माध्यमांनी हजेरी लावली होती, मात्र विदेशी मीडियाला यातून वगळण्यात आले होते. यंदा पहिल्यांदाच विदेशी माध्यमानसमोर भागवत संघाची बाजू मांडणार असल्याने साहजिकच यातून काय निष्पन्न होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माधवबाग व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह मुक्ती कार्यशाळेचे आयोजन

Next Post

उदयनराजे,त्रास झाला तर तुम्ही का सांगितलं नाही- सुप्रिया सुळे

Next Post

उदयनराजे,त्रास झाला तर तुम्ही का सांगितलं नाही- सुप्रिया सुळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo