Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माधवबाग व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह मुक्ती कार्यशाळेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- माधवबाग व कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी भवन मायादेवी नगर जळगांव येथे मधुमेह मुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्याबाहेरील सुद्धा लाखो मधुमेह  रुग्णांना रोगमुक्त आरोग्यदायी जीवनाचा मार्ग दाखवणारे व जीवनशैली संबंधित रोगांना काढून टाकण्याचा विडा उचलणारे माधवबाग सर्वाना परिचत आहे.  मधुमेह झाला हे कळताच अनेकांना काळजी पडते ती पथ्य पाळण्याची,नियमित औषधे व इन्शुलीनची तसेच आता यातून मुक्ती नाही अशी मानसिकताच स्वीकारली जाते.ही मानसिकता बदलण्याचे गरजेचे असून स्व:साठी वेळ द्या तसेच आपला आहार-विहार-विचार यांच्या योग्य नियोजनाने मधुमेह आणि इतर आजारांवर मात करून चांगल जिवन जगता येत व मधुमेहा पासून निश्चित मुक्ती प्राप्त कराल असे डॉ.मिलींद सरदार यांनी यावेळी बोलून दाखविले. या वेळी डॉ. प्रशांत याकुंडी म्हणाले की,औषधे,गोळ्या न घेता,योग्य आहार,नियमित व ठराविक व्यायाम, तणावमुक्ती या सूत्रांचा वापर करून मधुमेह पासून मुक्ती मिळू शकते.

या मधुमेह मुक्ती कार्यशाळेत बर्‍याच जणांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी कृतीफाऊंडेशनच्या कार्यध्यक्षा व माधवबाग चे संचालक डॉ. श्रद्धा माळी साध्या सोप्या व्यायामाद्वारे, कडधान्ये, सलाडचे जेवणात प्रमाण वाढवून हिरवी संजीवनी सेवन करून सांगितलेली पथ्ये पाळून मधुमेह मुक्ती निश्चित प्राप्त होईल, हा विश्वास डॉ.श्रध्दा माळी यांनी यावेळी दिला. यावेळी उपस्थितांच्या आरोग्य विषयक प्रश्नांचे आणि शंकाचे निरसन करुन माधवबागची कार्यपद्धती व जनजागृती बाबत अमित माळी यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित डॉ.श्रेयस महाजन यांनी मधुमेह पासून मुक्ती मिळेल, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेत उपस्थित डॉ.मिलिंद सरदार- मुंबई, डॉ. प्रशांत याकुंडी- औरंगाबाद, डॉ.श्रद्धा माळी- जळगांव, डॉ. श्रेयस महाजन- जळगांव, अमित माळी, कृती फाऊंडेशनचे सचिव जि.टी.महाजन, फिजिओथेरपिस्ट डॉ.अमित जैसवाल उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची मासिक बैठक उत्साहात संपन्न

Next Post

RSS सरसंघचालक मोहन भागवत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी विदेशी मीडियाशी साधणार संवाद

Next Post

RSS सरसंघचालक मोहन भागवत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी विदेशी मीडियाशी साधणार संवाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo