Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

Sunil Dutt Birth Anniversary : अन् सुनील दत्त यांची नोकरी नर्गिसमुळे जाता जाता वाचली होती…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
Sunil Dutt Birth Anniversary : अन् सुनील दत्त यांची नोकरी नर्गिसमुळे जाता जाता वाचली होती…


आज 6 जून सुनील दत्त यांचा वाढदिवस आहे. अभिनेते सुनील दत्त उर्फ बलराज दत्त आज आपल्यात नाहीत. पण एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून ते कायम लोकांच्या मनात जिवंत असतील.

6 जून 1929 रोजी त्याकाळी भारतात असलेल्या पाकिस्तानमधील झेलम येथे सुनील दत्त यांचा जन्म झाला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना वयाच्या पाचव्या वर्षी  त्यांच्यावरुन वडीलांचे छत्र हरपले. ते अठरा वर्षांचे असताना भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान उठलेल्या दंगलीतून याकूब नावाच्या मुस्लिम तरुणाने सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचवले होते.

फाळणीनंतर सुनील दत्त कुटुंबीयांबरोबर हरियाणाच्या यमुना नगर स्थित मंडोली गावात स्थायिक झाले. त्यानंतरचा काही काळ त्यांनी लखनौमध्ये घालवला. येथून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्यांनी काही काळ मुंबईतील ‘बेस्ट’ या लोकल बसमध्ये नोकरी केली. यादरम्यान  सिलोन रेडिओमध्ये आरजेची नोकरी करत असताना त्यांच्या फिल्मी करिअरलाही सुरुवात झाली.  

सिलोन  रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून काम करत असताना अभिनेत्री नर्गिसची मुलाखत घेण्याची सुनील दत्त यांची इच्छा होती. ती संधी लवकरच त्यांना मिळाली. पण ही मुलाखत झालीच नाही. याचे कारण म्हणजे, नर्गिस समोर आल्यावर सुनील दत्त एक शब्दही बोलू शकले नाहीत. नर्गिस त्यावेळी यशोशिखरावर होत्या. नर्गिस यांना पाहिले आणि सुनील दत्त यांना काहीही सुचेनासे झाले. त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडेला. अखेर ती मुलाखत रद्द करण्यात आली. यामुळे सुनील दत्त यांची नोकरी जाता जाता वाचली. विशेष म्हणजे, ज्या अभिनेत्रीला पाहून सुनील दत्त यांना घाम फुटला होता, तिच्यासोबत काम करण्याची संधी पुढच्या काही वर्षांत त्यांच्यापुढे चालून आली. इतकेच नाही तर हीच अभिनेत्री पुढे त्यांची पत्नी झाली.  

1957 साली साली सुनील दत्त व नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ या सिनेमात एकत्र काम केले. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. याच सिनेमाच्या सेटवर सुनील दत्त यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले आणि त्यांच्यातील लव्हस्टोरी बहरायला लागली. त्यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले. नर्गिसवर सुनील दत्त यांचे प्रचंड प्रेम होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी प्रा.संजय मोरे यांचा आगळा वेगळा उपक्रम

Next Post

महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन…

Next Post
महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन…

महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo