Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंतर्नादच्या प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांनी जागवली शिवरायांची थोरवी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अंतर्नादच्या प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेत बालवक्त्यांनी जागवली शिवरायांची थोरवी

शिवजयंती निमित्त जळगाव जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेत ३१९ स्पर्धकांचा सहभाग

प्रतिनिधी l भुसावळ

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ३१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्रथम फेरी ऑनलाईन घेण्यात आली होती.अंतिम फेरी बक्षीस वितरणा पूर्वी घेण्यात आली होती.यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष होते.पाच गटातील २० विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना रविवारी (दिनांक ६ ) गौरवण्यात आले.अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी,ताप्ती एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मोहन फालक, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन जळगावचे अजय बढे, प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे, रेल्वे स्कुलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील पाच गटातील प्रत्येकी १२ विद्यार्थी यानुसार ६० विद्यार्थ्यांची अंतिम फेरी नहाटा महाविद्यालय लायब्ररी हॉल येथे रविवारी पार पडली.परीक्षक म्हणून सतीश कुलकर्णी, आनंदा सपकाळे, श्रीकांत जोशी, नाना पाटील, सुनील पाठक, संध्या भोळे,दिनकर जावळे, दीपक कुलकर्णी, मीरा जंगले, संध्या महाजन, रीता शर्मा, गणेश जावळे, शैलेन्द्र वासकर,ज्योती लिलाधर राणे, अतुल इंगळे, अमित कुमार पाटील, श्रीश चिपळोणकर, जयश्री काळवीट, विक्रांत चौधरी, दुर्गादास पाटील, ज्ञानेश्वर घुले,सौ.ज्योती चौधरी, विजय सिंग पाटील, पंकज पाटील, ऋषिकेश पवार, हेमांगिनी चौधरी,भास्कर जाधव यांनी काम पाहिले.

अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख जीवन महाजन यांनी केले.शिक्षण आणि सामाजीक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल ज्ञानेश्वर घुले आणि डॉ.संजू भटकर यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला.क्रान्ती सुरवाडे, ज्योती वानखेडे, यश माखिया, विलास निकम यांचा विध्यार्थ्यांना प्रेरित केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. समर्थ पाटील या विध्यार्थ्यांच्या पोवाड्याने कार्यक्रमास सुरवात झाली, त्यानंतर स्पर्धेच्या ३२ परिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी तर आभार स्पर्धा सह समन्वयक वंदना भिरूड यांनी मानले.सन्मानपत्राचे वाचन प्रकल्प समन्वयक शैलेंद्र महाजन यांनी केले.यशस्वीतेसाठी राजेंद्र जावळे, प्रदीप सोनवणे, प्रा.श्याम दुसाने, समाधान जाधव, राजू वारके, अमित चौधरी,सचिन पाटील, भूषण झोपे, मंगेश भावे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते
पहिला गट ( इयत्ता 1ली , 2 री )
प्रथम स्तव्य कमलेश शामकुवर (पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावल), द्वितीय ऋतुजा मनोज सरोद (जि प शाळा लोहारा तालुका, पाचोरा), तृतीय वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील (गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यामंदिर, जळगाव), उत्तेजनार्थ – हिंदवी सुनील पाटील (बालाजी प्राथमिक विद्यामंदिर, पारोळा)

द्वितीय गट ( इयत्ता 3 री, 4 थी )
प्रथम विधी गजानन किनगे (काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव), द्वितीय यशश्री सुधाकर सपकाळे (जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ), तृतीय अवंतिका योगेश पाटील (सेंट अलॉयसियस कॉन्व्हेंट हायस्कूल, भुसावळ),उत्तेजनार्थ – निरंजन जितेंद्र सोनवणे (भाऊसाहेब काशिनाथ लाठी शाळा, जळगाव)

तृतीय गट ( इयत्ता 5 वी ते 8 वी )
प्रथम गायत्री शिवाजी ठाकूर (गो से हायस्कूल, पाचोरा),द्वितीय हंसिका नरेंद्र महाले(सेंट अलोयसिस कॉन्व्हेंट हायस्कुल, भुसावळ ), तृतीय निधी राकेश मुंडके ( ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ), उत्तेजनार्थ – चंदन पुरुषोत्तम पाटील (जिल्हा परिषद शाळा, टहाकळी ता-भुसावळ)

चतुर्थ गट ( इयत्ता 9 वी ते 12 वी )
प्रथम कोमल चंद्रकांत शिरसाळे (दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यामंदिर, सुनसगाव ),द्वितीय प्रथमेश निलेश पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर),तृतीय पायल गजानन थोरात (ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव),उत्तेजनार्थ -अश्विनी गोपाळ पाटील (दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय, सुनसगाव)

पाचवा गट (खुला गट )
प्रथम कल्याणी संजय अहिरे (जी जी खडसे कॉलेज, मुक्ताईनगर), द्वितीय गजानन काशिनाथ इंगळे ( भुसावळ ) तृतीय रवींद्र प्रकाश पाटील(उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा, बोरावल,ता.यावल), उत्तेजनार्थ – आकांक्षा समाधान जाधव (भुसावळ)

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथि निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

Next Post

प्रतापराव पाटील यांचा अपघातग्रस्ताला मदतीचा हात

Next Post
प्रतापराव पाटील यांचा अपघातग्रस्ताला मदतीचा हात

प्रतापराव पाटील यांचा अपघातग्रस्ताला मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d