Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2026
in जळगाव, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

जळगाव- (प्रतिनिधी) – अनुभूती निवासी शाळेत दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेच्या असेंब्ली हॉलमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, यावेळी शाळेचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन आणि प्राचार्य देबासिस दास उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ५० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहायला मिळणार आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, खगोलशास्त्र आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान अशा विविध शाखांतील प्रकल्पांचा समावेश असून, हे प्रकल्प केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनातील आव्हानांना विज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्यावर आधारित आहेत.

पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, स्मार्ट तंत्रज्ञान आणि शेतीतील आधुनिक उपाययोजना यांसारख्या विषयांवर विद्यार्थी कल्पकतेने आपले मॉडेल्स सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन रुजविण्यासाठी दरवर्षी असे प्रदर्शन भरविले जाते. शाळेच्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रकल्पांची निर्मिती केली आहे. स्कूलचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांनी अनुभवावर आधारीत शिक्षणाची संकल्पना अवलंबली आहे. सायन्स प्रदर्शना सारखे विविध उपक्रम त्यांच्याच प्रेरणेतून राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न यातून होत आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी इंटर-स्कूल विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विविध शाळांतील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी, टीमवर्क आणि निरोगी शैक्षणिक स्पर्धेला चालना देणे हा आहे. दुसऱ्या दिवशी नामवंत वैज्ञानिक आणि विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते १२:०० या वेळेत शाळेच्या माध्यमातून नोंदणी करून विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्याची सोय केली आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी यांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आधी स्नेहल जोशी यांच्याशी ०२५७-२२६४६०० या दूरध्वनीवर संपर्क साधावा व अग्रीम नोंदणी करावी असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Next Post

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

Next Post
कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d