Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे विविध धोरणांच्या नियोजनासाठी संबंधितांनी सहकार्य करावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी  विभागाकडून राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 व्या फेरीच्या प्रशिक्षण बैठकीचे उद्घाटन अर्थ व सांख्यिकी संचालक र. र. शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रशिक्षण बैठकीला उपस्थितांना संबोधतांना शिंगे म्हणाले की, या प्रशिक्षणाचा उद्देश हा देशांतर्गत पर्यटनावरील खर्च आणि बहुविध निर्देशांक पाहणी हा असून कुटुंबयादी, देशांतर्गत पाहणी, बहू निदेशक पाहणी या विषयांची पाहणी असून तीनही प्रकारातील पत्रके भरावयाची आहेत.

सदरची पाहणी जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या दरम्यान घेण्यात येणार आहे. पाहणीत 21.1 पत्रक (देशांतर्गत पाहणी) व 5.1 पत्रक बहू निदेशक पाहणी या पत्रकात शाश्वत विकास ध्येय साधनासाठी हवे असलेले मापदंड प्राप्त करण्यासाठी सरकारला उपयोग होणार आहे. या सर्वेक्षणातून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचल्या/किंवा काय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच पर्यटन क्षेत्रांचा विकास व त्या ठिकाणाला भेट त्यातून किती विकास साधला याबाबत माहिती उपलब्ध होणार आहे.

 शाश्वत विकास ध्येय साधण्यासाठी सरकारने 2014 पासून काम सुरू केले असून 2030 पर्यंत पुर्ण करावयाचे आहे. तसेच कोणत्या कारणास्तव स्थलांतर व 2014 नंतर झालेले नवीन बांधकाम याबाबत प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान यासारख्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या किंवा नाही याबाबतची विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे.

या पाहणीच्या  निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर विविध धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी केला जातो. त्यामुळे सदर पाहणीसाठी सर्वांनी योग्य माहिती देवून सहकार्य करावे. असे आवाहन सहसंचालक,अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय,नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 5 फेबुवारीपर्यत अर्ज करावे

Next Post

नरवीर तानाजी मालुसरे : महापराक्रमी अद्वितीय योद्धा

Next Post
नरवीर तानाजी मालुसरे : महापराक्रमी अद्वितीय योद्धा

नरवीर तानाजी मालुसरे : महापराक्रमी अद्वितीय योद्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d