Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

असंख्य बलिदानातून भारत भूमी जगासाठी आदर्शवत – प्राचार्य डॉ पी आर चौधरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/01/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
असंख्य बलिदानातून भारत भूमी जगासाठी आदर्शवत – प्राचार्य डॉ पी आर चौधरी

हजारो वर्षापासून भारतभूमी परकीय आक्रमणे, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर संघर्ष आणि आणि अनगीणत बलिदानातून प्राप्त देशाचे स्वातंत्र्य व संविधानावर आधारित लोकशाही गणराज्य अवघ्या विश्वाला मार्गदर्शक आणि आदर्शवत असल्याचे मत प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी व्यक्त केले.

ते फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पिंगला धांडे, औषधनिर्माण पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एल चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांच्यासोबत विविध शाखांचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना विषाणू प्रादुर्भावा च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि विद्यापीठ यांच्या अटी व नियमांच्या अधीन राहून धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक आणि सामाजिक एकोपा या ज्वलंत विषयावर पथनाट्य सादर करण्यात आली. कॅडेट वेदांत राजपूत याने प्रजासत्ताक दिवसाचा इतिहास आणि वर्तमानात युवकांची जबाबदारी या विषयावर मनोगत व्यक्त केले. कॅडेट गणेश चव्हाण याने देशभक्तीपर गीत सादर करून सैनिकांच्या प्रती सन्मान व्यक्त करणारी भावनिक कविता सादर करून उपस्थित सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.

याप्रसंगी प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फैजपुर चे योगदान, कर्मयोगी धनाजी नाना चौधरी व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांचा सामाजिक सेवेचा वारसा आणि महाविद्यालयाचे शैक्षणिक योगदान याविषयी सांगतानाच महत पराकाष्टा ने मिळालेल्या स्वातंत्र्याचा व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाच्या विकासात भर टाकून भारतभूमी चा नावलौकिक वाढवण्यात मोलाची भूमिका पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी दिव्य मराठी वृत्तपत्र समूहाच्या वतीने प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांना खान्देश रत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे यांच्या हस्ते खान्देशरत्न प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरिषदादा मधुकरराव चौधरी आमदार – यावल / रावेर विधानसभा मतदारसंघ, सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी महोदय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ दीपक सूर्यवंशी, क्रीडा संचालक डॉ जी एस मारतळे, राष्ट्रीय सण व उत्सव समिती चेअरमन डॉ आय पी ठाकूर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ जी जी कोल्हे, श्री संतोष तायडे, श्री नारायण जोगी, श्री शेखर महाजन, श्री सिद्धार्थ तायडे, श्री गुलाब वाघोदे, श्री पराग राणे इत्यादींनी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कामगार कल्याण केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगर तर्फे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगर तर्फे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा ग्रामीण व जिल्हा महानगर तर्फे भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d