Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आजपासून प्रिकॉशन डोसला सुरुवात कचरूलाल बोहरा यांनी घेतला तालुक्यातील प्रथम प्रिकॉशन डोस;दोन दिवसात करणार उद्दिष्ट पूर्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आजपासून प्रिकॉशन डोसला सुरुवात कचरूलाल बोहरा यांनी घेतला तालुक्यातील प्रथम प्रिकॉशन डोस;दोन दिवसात करणार उद्दिष्ट पूर्ण

जळगाव-(प्रतिनिधी )-जिल्हाधिकारी अभिजित राऊत,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व वय वर्षे ६० वरील सहव्याधी असलेले नागरिक यांच्या प्रिकॉशन डोसला आज सुरवात करण्यात आली.जामनेर तालुक्यात कचरूलाल बोहरा यांना ६० वर्षांवरील नागरिकांचा पहिला  प्रिकॉशन  डोस देण्यात आला. प्रथम प्रिकॉशन डोस घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नगरपालिका जामनेर चंद्रकांत भोसले यांच्याकडून बोहरा यांचा सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ.हर्षल चांदा,मुख्याधिकारी नगर पालिका चंद्रकांत भोसले,वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.सागर पाटील,गटनेते न.पा. जामनेर डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक सुहास पाटील,सुहास चौधरी,तालुका मलेरिया पर्यवेक्षक  व्ही.एच.माळी,आरोग्य साहाय्यक पुंडलिक पवार, सुनील पाटील,आरोग्य सेविका कविता नवघरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व ६० वर्षे वरील सह व्याधी असलेल्याना दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असतील अशा लाभार्थींना च प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.

अशा लाभार्थ्यांना कोव्हीन सिस्टीम मधून प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबर वर एस एम एस प्राप्त होणार आहे.पूर्वी नोंदणी न केलेल्या हेल्थ केयर वर्कर्स फ्रंट लाईन वर्कर्स यांना विहित नमुन्यात नोकरी च्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.जामनेर तालुक्यात एकूण 1586 हेल्थ केयर वर्कर्स,3019 फ्रंट लाईन वर्कर्स व 25314 साठ वर्षे वा अधिक वयाच्या सहव्याधी असलेल्या लाभार्थींना प्रिकॉशन डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नगरदेवळा गटात तितुर नदीवरील पुलासह साडेतेरा कोटींच्या विकासकामांचे आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

Next Post

“कोरोना” थांबविण्यासाठी लसीकरण, नियम पाळणे महत्वाचे : पालकमंत्री ना. पाटील

Next Post
“कोरोना” थांबविण्यासाठी लसीकरण, नियम पाळणे महत्वाचे : पालकमंत्री ना. पाटील

"कोरोना" थांबविण्यासाठी लसीकरण, नियम पाळणे महत्वाचे : पालकमंत्री ना. पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo