Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ईच्छादेवी चौक ते डी मार्ट रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2022
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
ईच्छादेवी चौक ते डी मार्ट रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने आंदोलन


जळगाव -(प्रतिनिधी) – ईच्छा देवी चौक ते डी मार्ट या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेली असुन या रस्त्यावर अर्धा फूट ते एक फूटापर्यंत खड्डे पडलेले आहेत . पावसाळा सुरू झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून जणू काही तलावच तयार झालेला आहे . यामुळे नागरिकांचे लहान – मोठे अपघात होत आहेत व अतोनात त्रास होत आहे . त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा किंवा रस्त्याची किमान दुरुस्ती तरी व्हावी यासाठी व यासर्व प्रकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने साचलेल्या पाण्यात कागदी नाव सोडुन , प्रतिकात्मक मासेमारी करत व खड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनादरम्यान रस्तावरची वाहतूक बंद करण्यात आलेली होती.


आंदोलन सुरू असतांना याविषयी जाब विचारण्यासाठी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष राऊत यांच्याशी फोन वर चर्चा केली असता दोघांनीही रस्ता त्यांच्या अधिपत्याखाली येत नाही असे सांगितले , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही . वाहतूक बंद असल्याने याठिकाणी मोठया प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेली होती . आंदोलनस्थळी एम आय डी सि पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरासे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करत लवकरच रस्त्याची समस्या मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सुमारे एक वर्षापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्ती साठी महानगरपालिकेच्या वतीने 25 लाखांची निविदा काढण्यात आलेली होती व बिल देखील अदा करण्यात आले . रस्त्याचे थातुरमातुर काम करून बिल पूर्ण काढण्यात आले , यासंदर्भात या प्रभागाच्या नगरसेविका खाटिक यांनी देखील काम न होता बिल काढण्यात आले अशी तक्रार दिलेली होती पण मक्तेदाराच्या प्रेमापोटी व आर्थिक हितसंबंध जोपासत सबंधितांनी या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले . याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे . तसेच याठिकाणी अपघात होऊन नागरिकांना जिवीत हानी झाल्यास याची जबाबदारी कोण घेईल ? रस्ता महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नव्हता मग रस्ता दुभाजक व दुरुस्ती महानगरपालिकेच्या वतीने कशी करण्यात आली ? असे सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आले . सदर काम लवकरात लवकर न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखिल जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिलेला आहे .


सदर आंदोलनात जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , सरचिटणीस सुनील माळी , युवक अध्यक्ष रिकू चौधरी , दिलीप माहेश्वरी , राजू मोरे , रमेश बहारे , सुहास चौधरी , सुशिल शिंदे , रहीम तडवी , इब्राहिम तडवी सर , अर्षद उर्फ सोनू शेख , वासीम शेख , आरिफ शहा बापू , इरफान बागवान , अकिल बाबा शेख , सत्तार भाई वेल्डिंगवाले , अजीज शेख , इब्राहीम भाई खान , युनूस शहा , कुणाल बागुल , भला तडवी , हितेश जावळे , राजू बाविस्कर , संजय जाधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रेडक्रॉस संचलित पाटील धर्मार्थ दवाखाना येथे सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा सुरू;लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन चा संयुक्त उपक्रम

Next Post

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन चा संयुक्त उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d