Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उतावीळ नवरदेवाची फसवणूक करुन मध्यस्थी ‘नॉटरिचेबल’

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/05/2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
उतावीळ नवरदेवाची फसवणूक करुन मध्यस्थी ‘नॉटरिचेबल’

लग्न जमत नव्हते.. अशात बहुत्प्रयासाने वधू-वर सूचक मंडळाकडून एक स्थळ आले. पाहण्यासाठी पाहुणे मुलीसह नवरदेवाच्या घरी आले.त्याच दिवशी लग्नही उरकले.चार दिवसांनी देवकार्य झाले मात्र, त्याच रात्री नवी नवरी दागिने घेऊन पसार झाली. लग्न जमविणारे मध्यस्थही नवरदेवाला १ लाख १० हजार रूपयांचा गंडा घालून ‘नॉटरिचेबल’ झाल्याची धक्कादायक घटना सरकोली येथे घडली.

कैलास देविदास भालेराव ( वय ३१, रा. सरकोली) असे फसवणूक झालेल्या नवरदेवाचे नांव आहे.एका साखर कारखान्यात लिपीक असलेल्या भालेराव यांचे अनेक दिवस लग्न जमत नव्हते. त्यांनी विविध ठिकाणी वधू-वर सूचक मंडळांकडे नोंदणी केली होती.यातच दि.१७ एप्रिल रोजी नांदेड येथील देविदास ताटे याचा फोन आला. औरंगाबादची मुलगी असून तुमच्या घरी पाहण्यास येतो असे त्याने सांगितले.दुसऱ्याच दिवशी ते पंढरपुरात येऊन मुक्कामी थांबले.

दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बोलेरो जीपने (एम. एच. २२ / यू. २१७१) देविदास ताटे, शीतल भीमराव धुमाळ नावाची मुलगी,तिचा मामा बाळू कदम, विष्णु काकडे व पूजा पवार (रा.वर्धा) नाव सांगणारी तिची बहीण असे सर्वजण भालेराव यांच्या घरी पोहोचले.दोन्हीकडून ओळखी करून दिल्या गेल्या. स्थळ सर्वांना पसंद पडले. त्यानंतर मध्यस्थ ताटे याने आपल्याला १ लाख व गाडीभाडे १० हजार द्यावे लागेल. तसेच आजच लग्न करावे लागेल, अशी अट घातली.नवरदेव भालेराव यांनी ती मान्य करून लग्नाची तयारी केली. सर्वांच्या साक्षीने लग्न पार पडले. ठरल्यानुसार ताटे यांना पैसे दिल्यानंतर ते सर्वजण निघून गेले.

दि.२३ एप्रिलपर्यंत देवकार्य आटोपून रात्री ११ वाजता सर्वजण झोपी गेले. त्यानंतर रात्रीतच नवरी शीतल ही सुमारे ६० हजारांचे दागिने घेऊन पसार झाली.याबाबत भालेराव यांनी ताटे व इतरांशी संपर्क साधला. सुरूवातीला त्यांनी वेळ मारून नेली. त्यानंतर त्यांनी सर्वजण ‘नॉटरिचेबल’ झाले. याद्वारे सदर चौघांनी फसवणूक केल्याची फिर्याद कैलास भालेराव यांनी तालुका पोलिसांत दिली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामन ने केले वधूसोबत लाजिरवाणे कृत्य

Next Post

‘या’ भारतीय शास्त्रज्ञाने हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तानला दिली गुप्त माहिती

Next Post
‘या’ भारतीय शास्त्रज्ञाने हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तानला दिली गुप्त माहिती

'या' भारतीय शास्त्रज्ञाने हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तानला दिली गुप्त माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo