Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतीपैकी 510 ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयोची कामे सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

उस्मानाबाद, दि. 1 (जिमाका) :-  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर ‍जिल्ह्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यासाठी आज रोजी एकूण 621 ग्रामपंचायतीपैकी 510 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु आहेत. त्या कामांवर एकूण 1172 हजेरी पत्रके निर्गमित केली आहेत. या कामांवर एकूण 12 हजार 251 मजुरांची उपस्थिती आहे. 

 वरील कामांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 910 कामे, कृषि विभागाची -95, सामाजिक वनीकरण-34, वन विभागाची-35, रेशीम विभागाची-81 व जलसंधारण विभागाच्या 17 कामाचा समावेश आहे. या कामामध्ये घरकुलाची 178 कामे, वैयक्तिक सिंचन विहिरी – 270, सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर-361, तुती लागवड-82, फळबाग लागवड -69, वृक्ष लागवड -41, गाळ काढणे -30 व इतर कामे मनरेगा अंतर्गत सुरु असून जिल्ह्यामध्ये मजुरांच्या मागणी प्रमाणे मजुरांना कामे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्यात येत आहे.      

कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामावर हँड सॅनिटायझर, साबण, मास्क इत्यादी साहित्य मजुरांना उपलब्ध करुन दिले असून सामाजिक अंतर (Social Distance) चे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.         जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) विभागात मग्रारोहयो कामाबाबत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या यंत्रणेच्या कामासाठी नियंत्रक म्हणून  श्री.आर.एस.बेद्रे, नायब तहसीलदार (रोहयो) मो. क्र.7058056777 यांची नियुक्ती केली आहे. नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.(02472-222279) असा आहे.          

ग्रामपंचायत स्तरावरील कामाच्या नियंत्रकपदी श्री.अविनाश गायकवाड, सहायक लेखा अधिकारी, नरेगा सेल, जि.प. उस्मानाबाद मो.क्र.9552016701 (नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. 02472-220611) यांची नियुक्ती केली आहे. मग्रारोहयोच्या कामाबाबत कांही अडचणी असल्यास नागरिकांनी  संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शिवार हेल्पलाइन सुरू

Next Post

मग्रारोहयोच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त

Next Post

मग्रारोहयोच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo