Tuesday, March 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोल तालुक्यात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान;अद्याप पंचनामे नाही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

शेतकऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन

एरंडोल- (शैलेश चौधरी)- वादळाची तिव्रता व त्यामुळे झालेल्या बेमोसमी अतीवृष्टीमुळे  एरंडोल तालुका परिसरात  पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतातूर झाले आहेत मात्र प्रशासन उदासीन असून अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.
गेल्या आठवड्या पासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे खडके बु।खडके खुर्द,खर्ची,खेडी, आदि एरंडोल तालुक्यातील गावांत मका, कापुस,सोयाबीन ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.नुकसानीची तीव्रता एवढी प्रचंड आहे की, मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. कापूस वेचणीवर आल्यामुळे त्यात पावसामुळे अंकुर फुटले आहेत, शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे.पिके काढणीवर असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने पिकांसाठी खर्च केलेले पैसे ही शेतकर्यांना मिळणार नाहीत एवढी गंभीर परीस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत व्हावेत तसेच शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी एरंडोल येथे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना समस्त तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर सर्व पंचनामे पूर्ण केले जातील तसेच शेतकर्यांच्या समस्यांप्रश्नी प्रशासकीय अधिकारी या नात्याने लक्ष घालणार असल्याचे तहसिलदार खेतमाळीस मँडम यांनी सांगीतले,या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे पदाधिकारी मा. किशोरभाऊ निंबाळकर व सोबतच पि.जी पाटील सर (माजी सरपंच,खडके-खुर्द),मयूर वाणी(सामाजिक कार्यकर्ते)राजू वंजारी (माजी सरपंच, खडकेसिम),साहेबराव पाटील(माजी सरपंच),बापू पाटील, नारायण पाटील,विलास पाटील,अशोक पाटील त्याचबरोबर खडकेसिम-खडकेखुर्द (गणेशनगर)येथील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सतर्कता, जागरूकता सप्ताहनिमित्त भविष्य निर्वाह निधी विभागातर्फे जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन

Next Post

नूतन मराठा विद्यालयात सरदार पटेल जयंती साजरी

Next Post
नूतन मराठा विद्यालयात सरदार पटेल जयंती साजरी

नूतन मराठा विद्यालयात सरदार पटेल जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d