Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस.एस.मनियार विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या औचित्याने २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सप्ताहात विविध स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
एस.एस.मनियार विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या औचित्याने २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सप्ताहात विविध स्पर्धा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- येथील एस.एस.मनियार विधी महाविद्यालयात दि.२४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व दि २ ऑक्टोबर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राज्यस्तरीय विविध स्पर्धा व सर्वेक्षण ऊपक्रम ई पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.

यात घेतल्या गेलेल्या स्पर्धेत खालील रा.से.यो विद्यार्थी, विद्यार्थीनींना बक्षीसे मिळालीत.

डिंपल बऱ्हाटे रॅक १- फीट इंडिया फ्रिडम रन स्पर्धा. शिलरत्न जंजाळे रॅक २- लाॅकडाऊन काळातील माझ्यातील स्टार गायक.डिंपल बऱ्हाटे रॅक ३- लाॅकडाऊन काळातील फोटोग्राफी. त्यात प्रामुख्याने खालील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. दिनांक २४ रोजी लाॅकडाऊन (टाळेबंदी) काळातील सामाजिक संवेदना यात शिलरत्न जंजाळे व इतर रा.से.यो. विद्यार्थी व विद्यार्थीनींने वरणगाव ता.भुसावळ व अनेक ठिकाणी सॅनिटायझर व मास्क वितरीत केले.

दिनांक २५ रोजी लाॅकडाऊन काळातील माझ्यातील स्टार गायक यात समृद्धी अंबीकर, शिलरत्न जंजाळे व इतर विद्यार्थी व विद्यार्थीनींने सामाजिक जनजागृती व प्रबोधन या विषयावर सुमधूर गाणे गायले.

दिनांक २६ रोजी लाॅकडाऊन काळातील माझ्यातील कवी, यात किमया देशमुख व इतर विद्यार्थी व विद्यार्थीनींने सामाजिक जनजागृती व प्रबोधन या विषयावर कविता सादर केली.

दिनांक २७ रोजी एकपात्री प्रयोग स्पर्धा सामाजिक अंतर यांचे महत्त्व विशद करणारा एक प्रयोग चैताली देशमुख व इतर विद्यार्थीनी यांनी सादर केला.

दिनांक २८ रोजी फीट इंडिया फ्रिडम रन यात दीपक दुबे व इतर रा.से.यो विद्यार्थ्यांनी ३.२ कि.मी रनिंग केली व डिंपल बऱ्हाटे व इतर रा.सो.यो विद्यार्थीनींनी ३ किमी सायकलींग केली. या सर्वांनी जिपीएस रनिंग ट्रॅकर अॅपचा वापर केला.

दिनांक २९ रोजी वक्तृत्व स्पर्धा यात चैताली देशमुख व इतर विद्यार्थी, विद्यार्थीनींनी कोव्हीड १९ नंतरचे जग या विषयावर भाषणे केलीत.

दिनांक ३० रोजी लाॅकडाऊन काळातील फोटोग्राफी यात डिंपल बऱ्हाटे व इतर रा.से.यो. विद्यार्थीनींनी तापी नदीच्या तीरावर एक तेजवंत सुर्याचे विहंगम दृष्य टीपण्याचा प्रयत्न केला.

दिनांक १ रोजी पोस्टर, रांगोळी, कोलाज, क्ले मेकींग स्पर्धा यात चैताली देशमुख, किमया देशमुख, आकांक्षा शर्मा, कोमल मोहता व इतर रा.से.यो. विद्यार्थीनींनी कोव्हीड या विषयावर  सुंदर पोस्टर, मनमोहक रेखीव रांगोळ्या व इतर  ऊपक्रम केले.

दिनांक २ रोजी सत्याग्रह ते स्वच्छाग्रह यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्याग्रह सोबत आजच्या काळाची गरज म्हणून स्वच्छतेचा आग्रह विद्यार्थांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली. यात रा.से. यो.चैताली देशमुख, किमया देशमुख, कल्याणी जोशी, आकांक्षा शर्मा, कोमल मोहता या व इतर विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.

सदर कार्यक्रमाचे यशस्वीततेसाठी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. युवाकुमार रेड्डी, रा.से.यो.समन्वयक डाॅ रेखा पाहूजा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच कु.चैताली देशमुख बीएएलएलबी ५ वर्ष हीचे विशेष सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वप्नसाकार फाउंडेशन व सेवक सेवाभावी संस्थेतर्फे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d