Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा

चोपडा ;– येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गीता जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करुन तसेच श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे आणि थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल तसेच शाळा समन्वयक अश्विनी पाटील, सुचिता पाटील दीप्ती पाटील आणि दिपाली पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून अखिल मानवाला मार्गदर्शन केले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक मानवास सतत मार्गदर्शक असणाऱ्या श्रीमद्भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक आजही प्रत्येकास अनमोल मार्गदर्शन करतो. गीता जयंती निमित्त शाळेतील शिक्षिका कल्पना बारी यांनी विद्यार्थ्यांना भगवान श्रीकृष्णांनी गायलेल्या श्रीमद्भगवद्गीते विषयी सखोल मार्गदर्शन केले.
शाळेतील शिक्षिका विशाखा बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दरवर्षी २२ डिसेंबर हा दिवस श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्यांना ओळखण्यासाठी आणि लोकांमध्ये गणित विषयाचे महत्त्व आणि उगम याची जाणीव करून देण्यासाठी ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय गणित दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना श्रीनिवास रामानुजन यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना बारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील कला शिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Team Satymev Jayate

Tags: chopdajalgaon
Previous Post

वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणातील गाभा घटक : प्रा. कट्यारे

Next Post

तीन हजारांची लाच स्वीकारणारा महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

Next Post
तीन हजारांची लाच स्वीकारणारा महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

तीन हजारांची लाच स्वीकारणारा महावितरणचा तंत्रज्ञ जाळ्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo