Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर युवक समता परिषदेचा रास्ता रोको..!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर युवक समता परिषदेचा रास्ता रोको..!

युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक व सुटका

जळगाव:- ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी युवक समता परिषदेच्यावतीने आज रविवार रोजी सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकेच्या एकूण २७३६ जागांमधून ७४० जागा कमी होत आहेत. १२८ नगरपंचायती व २४१ नगरपालिकामधल्या ७४९३ जागांपैकी २०९९ जागा कमी होणार आहेत.

३४ जिल्हापरिषदेतील २००० जागांपैकी ५३५ जागा तर ३५१ पंचायत समितीमध्ये ४००० जागांपैकी १०२९ जागा कमी होणार आहेत २७७८२ ग्रामपंचायतमध्ये अंदाजे १,९०,६९१ जागांपैकी ५१४८६ जागा ओबीसी संवर्गातील कमी होत आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरीही राजकीय आरक्षण रद झाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. यामुळे सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज असल्याने, सर्व ओबीसी संघटना व समता परिषदेच्या युवक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी समता परिषद युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, यांच्यासह मार्गदर्शक ज्ञानेश्वर महाजन धरणगाव,शालिग्राम मालकर,ज्ञानेश्वर महाजन जळगाव, धनराज माळी सर,राजेंद्र महाजन,युवक आघाडीचे महानगराध्यक्ष हेमरत्न काळुंके,उपाध्यक्ष नितीन महाजन, संतोष परदेशी, गजानन महाजन कन्हैया देवरे, चंदू माळी, जितेंद्र महाजन यांना पोलिसांकडून अटक व सुटका करण्यात आली.

यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील,राजू पाटील, गौरव महाजन, शिवाजी महाजन, दिलीप महाजन कृष्णा महाजन मयूर माळी शैलेंद्र परदेशी यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार

Next Post

राज्यात कोतवाल संघटनेच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ कविता सोनवणे

Next Post

राज्यात कोतवाल संघटनेच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ कविता सोनवणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo