Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोणत्याही पक्षात जाणार नाही: संजय दत्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई:-बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं राजकारण प्रवेशाचं वृत्त फेटाळलं आहे. ‘राजकारणात उतरण्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा माझा अजिबात विचार नाही,’ असं त्यानं स्पष्ट केलं आहे.  

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मुंबईत झालेल्या एका सभेत संजय दत्तच्या राजकारण प्रवेशावर भाष्य केलं होतं. संजय दत्त २५ सप्टेंबर रोजी रासपमध्ये प्रवेश करणार आहे. विधानसभा निवडणुकीत तो पक्षाचा प्रचार करेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जानकर यांच्या वक्तव्याला बळकटी मिळाली होती. खरंचच संजूबाबा ‘रासप’मध्ये जाणार की काय, अशी चर्चा होती. मात्र, संजय दत्तनं ती फेटाळली आहे. 

‘जानकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही,’ असं त्यानं एका निवेदनात म्हटलं आहे. 

संजय दत्तसाठी राजकारण नवे नाही. त्याचे वडील व दिवंगत अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसच्या तिकिटावर ते मुंबईतून अनेकदा खासदार म्हणून निवडून आले होते. केंद्रात त्यांनी काही काळ मंत्रिपदही भूषवलं होतं. संजय दत्तची बहीण प्रिया दत्त यांनीही खासदार म्हणून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर, खुद्द संजय दत्तनं समाजवादीच्या तिकिटावर लखनऊमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कायदेशीर अडचणींमुळं त्याला माघार घ्यावी लागली होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मोदी सरकार देशाला दिवाळखोरीत ढकलतंयः काँग्रेसचा आरोप

Next Post

धक्का लागल्याने कोयत्याने वार;तिघांना अटक

Next Post
धक्का लागल्याने कोयत्याने वार;तिघांना अटक

धक्का लागल्याने कोयत्याने वार;तिघांना अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo