Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – मला नोकरीदेखील करायचीय, मला व्यवसाय करणारा नवरा हवाय, मला स्वातंत्र्य देणारा, माझ्या विचारांचा आदर करणारा नवरा हवा अशी इच्छा मुलींनी तर मला नोकरदार, समजून घेणारी, कौटुंबिक एकता ठेवणारी बायको हवी असा सूर मुलांचा होता. निमित्त होते अग्रवाल समाजाच्या विवाहेच्छूक वधू-वरांच्या परिचय मेळाव्याचे.

येथील श्री अग्रवाल नवयुवक मंडळातर्फे रविवारी खान्देशस्तरीय अग्रवाल समाजाचा वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी देशभरातील हजारो विवाहेच्छूक वधू-वर पालकांसह उपस्थित होते. मेळाव्याचे उदघाटन अग्रवाल नवयुवक मंडळाच्या पदाधिकार्यांनी दीपप्रज्वलन करून केले.

मेळाव्यात सकाळ पासून परिचय सत्र सुरु झाले. विवाहेच्छूक मुलगा व मुलगी यांनी मंचावर येत त्यांच्या आवडी निवडी आणि इतर वैयक्तिक माहिती दिली. यावेळी सभागृहात विवाहेच्छूक मुला-मुलींनी एकमेकांशी समोरासमोर बसून चर्चा देखील केली. एकमेकांचा स्वभाव, विचार, आवडीनिवडी, भविष्यातील प्लॅनिंग, कौटुंबिक रचना याविषयी एकमेकांना विचारले जात होते. अनेकांमध्ये वैचारिक मतभेद दिसले, मात्र अनेकांचे सूरदेखील जुळताना मेळाव्यात दिसत होते. यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी भेटी देत श्री अग्रवाल नवयुवक मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही सत्कार, भाषणे झाली नाहीत. विवाह आयुष्यभराचे पवित्र बंधन आहे. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करूनच विवाहेच्छूक वधू वरांनी विवाहाचा निर्णय घ्यावा असा विधायक हेतू ठेवण्यात आला होता. मेळाव्यात धुळे, नंदुरबार,. पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, अकोला, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, बुलढाणा, बीड या जिल्ह्यांसह राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यातील विवाहेच्छूक वधू वर पालकांसह उपस्थित होते.

या मेळाव्याला जळगाव जिल्हा अग्रवाल संघटन, अग्रवाल महिला मंडळ, धुळे अग्रवाल समाज बायोडाटा बँक, नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाज या संघटनांचे सहकार्य लाभले. मेळावा यशस्वीतेसाठी अध्यक्ष मनीष अग्रवाल, सचिव हितेश अग्रवाल, पूनम अग्रवाल, राहुल अग्रवाल, अमित अग्रवाल, रुपेश अग्रवाल, महेश अग्रवाल, शाम अग्रवाल, जितेंद्र अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, मनिष मित्तल, गोपाल अग्रवाल, किसन मित्तल आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विविध मुस्लिम सामाजिक संस्थांतर्फे ना.गुलाबराव पाटील यांचा सत्कार;विविध मागण्यांचे निवेदन सादर

Next Post

नैवेद्य-कवी-(शितल शांताराम पाटील)

Next Post

नैवेद्य-कवी-(शितल शांताराम पाटील)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo