Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर भर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात -कृषिमंत्री

मालेगाव(उमाका वृत्त सेवा)- शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यातील रस्त्यांचे कॉक्रीटिकरणाचे काम होणे गरजेचे असून यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर विशेष लक्ष केंद्रीत करुन, या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सटाणा ते मालेगाव रस्ता राज्य मार्ग क्रं.19 या रस्त्याच्या कॉक्रीटिकरणासाठी राज्यशासनाच्या अर्थसंकल्पात दोन तर क्रेंद्र शासनाच्या सि.आर.एफ. निधीतून एक अशी कामे मंजूर असून या रस्ते विकासाच्या कामांचा शुभारंभ आज राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, राहूल पाटील, मनेाहर बच्छाव, सखाराम घोडके, राजेश गंगावणे, संदीप पवार, प्रमोद निकम, निळकंठ निकम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावात पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रस्तानिर्मीतीमध्ये काळी माती असल्यामुळे दर्जेदार रस्त्याचे काम होत नसल्याने कॉक्रीटिकरणातून रस्ता निर्मीतीचा संकल्प स्विकारण्यात आला आहे. कुसूंबा रस्ता राष्ट्रीय महामार्गात विभाजन करून ज्या पध्दतीने त्या रस्त्याचे कामकाज झाले आहे, त्याच प्रमाणे मालेगाव ते सटाणा रस्त्याचे कामकाज होवून भविष्यात चांगली सुविधा शेतकरी बांधवांना या माध्यमातून निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Team Satymev Jayate

Previous Post

७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन

Next Post

निवडणूक साक्षरता मंच प्रत्येक महाविद्यालयात स्थापन करावा -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo