Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चौबारीत एकाच रात्री ५ ठिकाणी घरफोडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
चौबारीत एकाच रात्री ५ ठिकाणी घरफोडी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

अमळनेर – (प्रतिनिधी) – तालुक्यातील चौबारी येथे १२ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखोचा ऐवज लंपास केला. त्यात १ लाख रुपये रोख व २ लाखाचे ५ तोळे सोने असा ३ लाखाच्या ऐवजाचा समावेश आहे.

हिंमत धुडकू पाटील (वय ९०)आणि कल्पना राजीव देसले (वय ५०) हे आपल्या राहत्या घरी पुढील भागात रात्री झोपले असता मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करुन १ लाख रुपये रोख व २ लाखाचे ५ तोळे सोने असा ३ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. शिवाय सोमा सखाराम कढरे, रवींद्र चिंधु पाटील, शांताराम डिगा पाटील, सुधाकर बाजिराव पाटील यांच्या घराचाही कडीकोंडा तोडत चोरीचा प्रयत्न केला. पैकी सोमा कढरे यांच्या घरातून दोन पोती पितळी भांडी चोरट्यांनी लंपास केली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश खलाणे, पोलीस उपनिरिक्षक वैभव पेठकर यांनी भेट देत घटनेची पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव पोलीस मुख्यालयातून श्वान व अंगुली निर्देशक पथकाला पाचारण करण्यात आले होते.

कल्पना देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन १२७/२०२१ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक वैभव पेठकर करत असून सहकार्य बिट अमलदार भास्कर चव्हाण व सचिन निकम यांचे आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आपुलकीचे डॉक्टर म्हणजे डॉ गिरीश सहस्त्रबुद्धे;३५ वर्षाची अविरत सेवा

Next Post

बाप्पा विथ सेल्फी! आपल्या लाडक्या बाप्पांसोबत सेल्फी घेऊन कॅमेऱ्यात कैद केल्या गोड आठवणी

Next Post
बाप्पा विथ सेल्फी! आपल्या लाडक्या बाप्पांसोबत सेल्फी घेऊन कॅमेऱ्यात कैद केल्या गोड आठवणी

बाप्पा विथ सेल्फी! आपल्या लाडक्या बाप्पांसोबत सेल्फी घेऊन कॅमेऱ्यात कैद केल्या गोड आठवणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo