Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती घराण्यासोबत मंदिरात अस होत असेल तर सर्व सामान्य लोकांची परिस्थिती असेल.

Desk Team by Desk Team
31/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका! संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे संतापल्या, ‘त्या’ पोस्टवरुन खळबळ

गुरुवारी संपूर्ण देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतांना दुपारनंतर संयोगीताराजे यांनी एक पोस्ट केलीय. त्या पोस्टवर खळबळ उडाली आहे.

नाशिक : संपूर्ण देशभरात गुरुवारी रामनवमीचा उत्साह बघायला मिळाला. याच दरम्यान अनेक जण शुभेच्छा देत असतात. पण याबाबत संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. त्यावरून खळबळ उडाली असून संयोगीताराजे यांची पोस्ट चर्चेत आली असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. याशिवाय संयोगीताराजे यांनी यावेळी काळाराम मंदिरातील पूजाऱ्याला खडेबोल सुनावल्याचं त्यांच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय त्यावेळी दर्शन घेतलेले फोटोही त्यावेळेला सोबत पोस्ट केले आहे.

खरंतर मागील महिण्यात संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस होता. यंदाच्या वर्षीचा वाढदिवस नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संयोगीताराजे छत्रपती या देखील नाशिकला होत्या. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच नाशिकला आल्याने विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या.

याच दरम्यान संयोगीताराजे छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन गेलेल्या संयोगीताराजे छत्रपती यांच्या सोबतचा घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितला आहे.
त्यावरून खळबळ उडाली असून सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
त्यामध्ये संयोगीताराजे यांनी पूजाऱ्याला छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका म्हणत सज्जड दमच भरला होता. याशिवाय वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांचा विरोध केल्यानंतर महामृत्युंजय मंत्र म्हंटले तरीही त्यांनी तिथे प्रश्न केलाच त्यानंतर संयोगीताराजे रामरक्षा म्हणत पूजाऱ्याला इतिहास सांगत ठणकावले होते.यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे पूजऱ्याचा विरोध लक्षात आल्यानंतर संयोगीताराजे यांनी ही मंदिरे कुणी वाचवली? छत्रपती यांनीच… मग त्या घराण्यातील आम्ही वारसदार आहोत मग छत्रपतींना शिकवण्याचं धाडस करू नका म्हणून सज्जड दम भरला होता. तरी पुजारी आम्ही म्हंटलेलं कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते.

Desk Team

Previous Post

श्री. सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

Next Post

काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ

Next Post

काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo