Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनजागृतीसाठी लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 13 – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व त्यांच्या सभासद असलेल्या संस्थांच्या बळकटीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. अटल महापणन विकास अभियान अंतर्गत सुरु झालेल्या विविध उपक्रमांबाबत जनजागृतीसाठी लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव मेघराज राठोड यांच्या उपस्थितीत व जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आला. याप्रसंगी जामनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देवराव देशमुख यांचेसह जिल्ह्यातील विविध कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. एम. बी. गाढे, श्री. वाहेद तडवी, श्री. शशीकांत साळवे यांनी परीश्रम घेतले.

  या अभियानाचा उद्देश हा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ, सहकारी प्रक्रिया संस्था व विविध कार्यकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांना बळकट करणे, पणनच्या यात्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतकत्यांना कृषीपणन विषयक सुविधा देवुन संस्थांची आर्थिक उलाढाल वाढवणे.व याकामी समाजातील प्रत्येक घटक जसे, शासकीय संस्था, खाजगी संस्था (कार्पोरेट कंपन्या) व सभासद शेतकरी/जनता यांचा सहभाग घेणे असा आहे.

मा.मुख्यमंत्री व मंत्री सहकार, पणन व वस्त्रोद्योग यांचे सुचनेनुसार राज्यामध्ये अटल महापणन विकास अभियानातंर्गत सहकारी पणन व्यवस्थेतील 5 हजार संस्थांचे सक्षमीकरण करणेबाबत उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. या उद्दीष्ठानुसार जळगाव जिल्ह्यास प्रत्येक तालुकानिहाय 15 याप्रमाणे एकुण 225 संस्था, यात विविध कार्यकारी संस्था व खरेदी विक्री संघ बळकट करण्यासाठी सदर संस्थांमार्फत नविन व्यवसाय सुरु करण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले होते. या उद्दीष्टाप्रमाणेदिनांक 25.12.2016 ते 31.03.2017 या कालावधीमध्ये 79 विविध कार्यकारी संस्थांनी 79 व्यवसाय सुरु केलेले आहेत. तर दिनांक 25.12.2017 ते 01.07.2018 या कालावधीमध्ये 14 विविध कार्यकारी संस्थांनी 14 व्यवसाय सुरु केलेले आहेत. तसेचदिनांक 25.12.2018पासून 9 विविध कार्यकारी संस्थांनी 9 व्यवसाय सुरु केलेले आहेत.

अटल महापणन विकास अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यात अभियान सुरु झाल्यापासुन 102 विविध कार्यकारी संस्थांनी 102 प्रकारचे व्यवसाय सुरु केलेले आहेत. यामध्ये शेतीला लागणारी औषधी विक्री,  शेतीपुरक वस्तु विक्री, गोडावुन जागा भाड्याने देणे, पशुखाद्य विक्री, सेंद्रीय खत व पदार्थ विक्री, धान्य खरेदी विक्री, सेवा केंद्र, तोलकाटा, कृषी निविष्ठा विक्री अशाप्रकारचे शेतीपुरक व शेतक-यांना सेवा देणारे उदयोग सुरु केलेले आहेत. या उद्योगांमधून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अशी माहिती मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नवीन शिधावाटप दुकान मंजुरीसाठी कालबध्द कार्यक्रम जाहीर

Next Post

पालकमंत्री ना. गिरीष महाजन जिल्हा दौऱ्यावर

Next Post
अजित पवार यांची ना.गिरीश महाजन यांच्यावर टीका

पालकमंत्री ना. गिरीष महाजन जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo