सावळदबारा -(प्रतिनिधी )-येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक सावळदबारा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली संस्था सचिव श्रीमती रत्नाबाई कोलते यांनी प्रतिमा पूजन करून क्रांतीज्योती यांना अभिवादन केले याप्रसंगी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नारायण कोलते यांनी त्यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याविषयी सखोल माहिती दिली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताची पहिली महिला शिक्षिका आणि सामाजिक सुधारक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून सर्वप्रथम शिक्षण घेऊन त्यांनी मिशनरी शाळेमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले. महात्मा फुले यांच्यासोबत महिलांच्या आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणले
सावित्रीबाई फुले यांचे प्रमुख योगदान:
शिक्षणात क्रांती: 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली.
सामाजिक सुधार: बालविवाह, सती प्रथा आणि जातिवाद याविरुद्ध आवाज उठवला.
महिला सक्षमीकरण: विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि पीडित महिलांसाठी आश्रयगृह स्थापन केले.
लिखाणाची प्रेरणा: ‘काव्यफुले’ कविता संग्रह 1854 त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्याच्या शिक्षण आणि सामाजिक सुधारांच्या कार्यांना आठवतो आणि त्यांच्या आदर्शांना पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करूया असे मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष श्री भाऊराव कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळेस शाळेतील सर्व शिक्षक विजय सिंग राजपूत विकास पाटील मुकुंदा व्यवहारे सुदाम राठोड भास्कर ससाणे विनोद जाधव भूषण देसले भास्कर खमाट पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड अमोल कोलते गणेश मोहने शिक्षकेतर कर्मचारी अजबराव चव्हाण श्याम जाधव बाबासाहेब कोलते राहुल बडक संदीप कोलते विद्यार्थी उपस्थित होते अनेक विद्यार्थिनींनी आज सावित्रीबाई फुले यांचा गणवेश परिधान केला होता हे कार्यक्रमाचे विशेष लक्ष होते अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली.










