Thursday, August 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प.सदस्य मधुकर काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; ५७ आशा स्वयंसेविका यांना १००० रु व कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जि.प.सदस्य मधुकर काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; ५७ आशा स्वयंसेविका यांना १००० रु व कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

पाचोरा(प्रतिनिधी)- पिंपळगाव-शिंदाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमित्ताने वरखेडी आरोग्य केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त जि.प. सदस्य मधुकर काटे यांचे रुग्ण कल्याण समिती व मान्यवरांच्या हस्ते साध्या पद्धतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोरोना लढ्यात अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना एक हजार रुपये मानधन व कोरोना योद्धा सन्मानपत्र  देण्यात आले. त्याचबरोबर पाचोरा तालुक्यात कोरोना लढ्यात प्रशासनासोबत धडाडीने कार्य करणाऱ्या व कोविड संसर्गित रुग्णांच्या उपचार कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.भुषण मगर यांना देखील यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व कोरोना योध्दा सन्मानपत्र  सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सरपंच,पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका आणि अंगणवाडी सेविका व आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास सनेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ, डॉ. शेखर पाटील, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी पदमसिंग पाटील,अंगणवाडी पर्यवेक्षिका,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार डॉ.शांतीलाल तेली, परेश पाटील, डॉ मयुर पाटील, डॉ दीपाली सोनवणे, ग्रामसेवक सतीश सत्रे, डी. एन.मोरे पोलीस पाटील वाणेगाव नितीन जमजाळे, निबोरी सरपंच बाळू धुमाळ, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. समाजातील वंचित घटकांना न्याय देणे व राजकीय क्षेत्रात काम करताना सामाजिक जाणिवेच्या अंगाने काम करायला आपण नेहमीच प्राधान्य देतो त्यामुळेच आज वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना युद्धात सहभागी योध्दाचा  सन्मान व आशा स्वयंसेवीकाना आर्थिक मदत व्हावी म्हणून असा उपक्रम राबवला असल्याचे मधुकर काटे यांनी मनोगतात सांगितले. तर आरोग्य सेवा ही सर्वोच्च सेवा असून कुठलीही प्रशंसा किंवा टीका-टिप्पणी चा विचार न करता यानंतर देखील रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर राहणार असल्याचे मनोगत डॉ.भूषण मगर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर डॉक्टर शेखर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

Next Post

नॅशनल युथ कौन्सिल पदाधिकाऱ्यांची निवड

Next Post
नॅशनल युथ कौन्सिल पदाधिकाऱ्यांची निवड

नॅशनल युथ कौन्सिल पदाधिकाऱ्यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo