जळगाव दि.27 प्रतिनिधी -जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या नविन जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक(गृह) संदीप गावित, राखीव पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री. विजय मोहरील, श्री. देवेंद्र पाटील, कवायत निर्देशक सोपान पाटील यांच्यासह सहकारी उपस्थितीत होते.

गुलमोहर, बेहळा, टिकोमा, बकूळ, निंब, जांभूळ अशी 80 च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम महत्त्वाचा असून झाडे जगविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे असे विचार यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी व्यक्त केले.










