Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे जीवन गाणे गातच जावे – संस्कृती , देशभक्ती, प्रबोधन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/08/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read


जळगाव- (प्रतिनिधी) – सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मार्फत जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त मध्यवर्ती कारागृहातील कैदी बांधवासाठी मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव अधिक्षक श्री. आर आर देशमुख यांनी यांनी प्रस्तावना करताना हा कार्यक्रम घेण्यामागची शासनाची भूमिका आणि कैदी बांधवांमध्ये होणारे सकारात्मक अपेक्षित बदल याबाबत माहिती दिली. प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावचे सचिव श्री. ए. ए. के. शेख यांनी मनोगत व्यक्त करताना असे आवाहन केले कि या जेलमधून बाहेर जाऊन एक चांगला व्यक्ती म्हणून समाजात व आपल्या परिवारात ओळख निर्माण करावी व झालेल्या चुकांची सुधारणा करून चांगले आयुष्य जगावे. मुख्य शासकीय अभिव्यक्ता तथा जिल्हा जळगाव वकील संघाचे अध्यक्ष श्री. केतन ढाके यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व कैदांचे मनोबल वाढवले.


कैदी बांधवांमध्ये सकारात्मक बदल होऊन भविष्यात गुन्हेगारी वृत्तीपासून दूर राहून इतरांना सहकार्य करण्याची भावना मनात ठेवणे आणि एक उत्तम माणूस म्हणून कुटुंबांसोबत आनंदी जीवन जगण्याचे प्रबोधन तसेच हे परमेश्वराने आपल्याला दिलेले आयुष्य हे अतिशय सुंदर आहे आणि ते प्रामाणिकपणे व जबाबदारीने जगावे जेणेकरून आपणा सोबत परिवाराला हि आनंदी ठेवता येईल असे प्रबोधन समुपदेशक तज्ञ मा. श्री गनी मेमन यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव येथे कैदी बांधवामध्ये देशाबद्दल प्रेम देशभक्ती जागृत व्हावी, भारताची संस्कृती कलेच्या माध्यमातून माहिती देणे, स्वागत गीत, शास्त्रीय नृत्य ,देशभक्ती पर गीते, क्रांतिकारी गीते, महाराष्ट्राची लोकधारा,लावणी, वासुदेव भारुड, वहिगायन, लोकगीते, योगा प्रात्यक्षिक, भारतीय स्वातंत्र चळवळीचे क्रांतिकारी व समाज सुधारक याच्या जीवनावर आधारित शारीही पोवाडातून कैदी बांधावाचे प्रबोधन करण्यात आले, या नंतर कैदी बांधव मधील काहींनी देशभक्ती पर गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली. ज्या कैदी बांधवांनी सादरीकरण केले याचा विशेष सत्कार करण्यात आला.
जीवन गाणे गातच जावे, संस्कृती , देशभक्ती, प्रबोधन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव मा. सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. श्री. आनंद लिमये यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुरुंग प्रशासनाला आदेश देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले.

अप्पर पोलिस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा पुणे श्री. सुनील रामानंद यांनी वैयक्तिक रित्या लक्ष घालून याबाबत योग्य ते निर्देश दिले. हेमंत पवार जनसंपर्क अधिकारी कारागृह व सुधार सेवा यांनी याबाबत योग्य तो समन्वय ठेऊन कार्यक्रम यशस्वी ठेवण्यासाठी सहकार्य केले.


श्री संदीप शेंडे, श्री संदीप पाटील , श्री चंद्रकांत पाटील याचे आभार अधिक्षक श्री. आर आर देशमुख यांनी केले. उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल न्यायाधीश ए. ए. के. शेख यांच्या वतीने जिल्हा समन्वयक श्री स्वप्नील वाघ व कार्यक्रम समन्वयक सौ. उज्ज्वला वर्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सहभागी कलाकर म्हणून श्री. आप्पा नेवे, श्री. संजू सूर्यवंशी, श्री. संग्राम जोशी, श्री. संदीप जोशी, श्री. प्रवीण महाजन, गायत्री ठाकूर, दर्शना वर्मा, सेजल वर्मा, मयूर अहिरराव, संहिता जोशी तसेच साऊडचे काम श्री महेश चिरमाडे यांनी पाहिले या सर्वांचे स्वागत आभार जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव अधिशक श्री. आर आर देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले व राष्ट्रागीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कबचौउमवि नामविस्तार दिन साजरा

Next Post

बॅंकेत FD करताय? मग RBI चे नवीन नियम वाचलेत का…?

Next Post

बॅंकेत FD करताय? मग RBI चे नवीन नियम वाचलेत का…?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d