Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ५६ अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ५६ अर्ज दाखल

जळगाव-(जिमाका)- आज दिनांक 3 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

            या लोकशाही दिनात जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 56  तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसूल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालकल्याण विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

            या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख एस.पी.घोंगडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी. ए. बोटे, तहसिलदार मंदार कुलकर्णी, गृह शाखेचे नायब तहसिलदार रविन्द्र मोरे यांचेसह  विविध विभागांचे अधिकारी  व प्रतिनिधी उपस्थित होते.

            लोकशाही  दिनाच्या कार्यक्रमानंतर उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेवून सर्व तक्रारी अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. या  सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरुन तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासणार नाही याची सर्व संबंधितांनी  दक्षता घेण्याच्या सूचनाही उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी  सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. त्याचप्रमाणे  नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत असे आवाहन उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे  यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रा.डॉ.नितीन बडगुजर राज्यस्तरीय मानवविकास पुरस्काराने सन्मानित

Next Post

मोटर वाहन कायद्याच्या तरतुदीचे पोस्टमार्टम- माजी न्यायाधीश अनिल वैद्य

Next Post

मोटर वाहन कायद्याच्या तरतुदीचे पोस्टमार्टम- माजी न्यायाधीश अनिल वैद्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo