Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 47 तक्रारी अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि.2:- जिल्हा प्रशासनातर्फे  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात    आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनात जिल्ह्यातील  नागरिकांकडून दाखल सर्व तक्रारी अर्ज संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाहीदिनात  एकूण 47 तक्रारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालविकास विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

            जिल्हास्तरीय लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम,जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी बी.ए.बोटे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही,जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रा.अ.चंदेल,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण योगेश पाटील,गिरणा पाटबंधारे विभागाचे यु.एन.कोळंबे,पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता कि.ज.आटोळे,सहाय्यक अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ,जळगाव आर.पी.पाटील, महसूल, जिल्हा परिषद, परिवहन, पोलीस, जिल्हा नियोजन, समाज कल्याण आदि विभागांचे  अधिकारी,  प्रतिनिधी उपस्थित होते.

            लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी  माहे फेब्रुवारी 2020 या महिन्याच्या  लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रारीं अर्जांचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच डिसेंबर 2019 पासून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी प्रत्येक तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यास सुरूवात झालेली आहे.या लोकशाही दिनाचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, या लोकशाही दिनास संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात.  तालुकास्तरीय लोकशाही दिनात आपल्या विभागाशी संबंधित प्राप्त तक्रारी स्विकारून निपटारा लवकरात लवकर करावा. तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रारदारांना आपल्या तक्रारींचे  समाधानकारक उत्तर मिळाले नाही  किंवा आपल्याला योग्य न्याय मिळाला नाही असे वाटल्यास ते तक्रारदार जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपल्या तक्रारी  दाखल करू शकतील. असेही  जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी  उपस्थित अधिकारी आणि तक्रारदारांना सांगितले.

            त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी लोकशाही दिनात मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेर  गावाहून नागरीक येत असल्याने  त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण/निराकरण  होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी आजच्या बैठकीत सर्व संबंधितांना दिला. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मू जे महाविद्यालयात ‘खान्देश सन्मान २०२०’ उत्साहात संपन्न

Next Post

ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील;ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे-प्रतिभा कोकंदे

Next Post
ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील;ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे-प्रतिभा कोकंदे

ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील;ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे-प्रतिभा कोकंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d