Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील अमृत कलश घेऊन स्वयंसेवक मुंबईला रवाना!

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक होणार सहभागी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/10/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील अमृत कलश घेऊन स्वयंसेवक मुंबईला रवाना!

जळगाव, दि.२६ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील ३५ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदान येथे दि.२७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होईल व त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा.रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील, आ.संजय सावकारे, आ.राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, DRDA प्रकल्प अधिकारी राजेन्द्र लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, अजय चौधरी, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर तसेच सर्व तालुक्यांचे बिडीओ उपस्थित होते.

जिल्ह्यातील १५पंचायत समिती, ०१महानगरपालिका व सर्व मिळून नगरपालिका मिळून १ असे १७ अमृत कलश बुधवारी सायंकाळी नेहरू युवा केंद्राच्या ३० स्वयंसेवक आणि एका मार्गदर्शकासह मुंबईकडे रवाना झाले. मुंबईच्या आझाद मैदान येथे दि.२७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अमृत कलश दिल्लीसाठी रवाना होतील. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानामध्ये अमृत कलशाच्या माध्यमातून जिल्ह्यातून एकत्र केलेली माती दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या अमृत वाटिकेत अर्पण केली जाईल.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार सादरीकरण कार्यशाळा संपन्न

Next Post

जि.प.शाळेत आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
जि.प.शाळेत आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जि.प.शाळेत आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d