Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे १५ व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे १५ व्या राष्ट्रीय अभिरुप  न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन

जळगांव(प्रतिनिधी)- एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृती १५ व्या अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी, उत्ताण चे माजी सहसंचालक मा. प्रमोद डी. आंबेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने करण्यात आले. या समारंभास जळगांवचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. जी. ए. सानप यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच केसीई सोसायटीचे सचिव अँड. एस. एस. फालक केसीई सोसायटीचे सदस्य यांची उपस्थिती लाभली. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी,  केसीई सोसायटीचे सहसचिव अँड. प्रमोद पाटील, मुट कोर्ट सोसायटी समन्वयिका डॉ. विजेता सिंग हे होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश बी. पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमास जिल्हा न्यायालयीन अधिकारी डी. ए. देशपांडे, जिल्हा सरकारी वकील अँड. केतन ढाके, जळगांव जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ऍड दर्शन देशमुख, पॅनल जजेस व महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोदर, प्रा. अमिता वराडे, प्रा. ज्योती भोळे, प्रा. चौधरी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. आंबेकर यांनी भारताच्या विविधतेतील एकात्मतेचा आधार हे भारतीय संविधान असून त्यातील मूलभूत ढाच्याचा भाग असलेली संघराज्य पद्धती आपल्या देशासाठी अनुकूल असल्याचे स्प्ष्ट केले. तसेच, कायदा, न्यायालय, वकील या सर्वांचे अंतिम ध्येय न्याय देणे आहे व न्याय देण्यासाठी केवळ कायद्याचा अभ्यास पुरेसा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषेवर आणि तथ्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच न्या. सानप म्हणाले की, तुम्ही स्वेच्छेने वकिली क्षेत्र निवडले असेल तर खूप परिश्रम घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकणार नाही. तसेच तुमच्या प्रतीपक्षांच्या वकिलांशी मैत्रीचे संबध ठेवा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच अँड. सुनील चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य. डॉ. युवाकुमार रेड्डी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात उपस्थित मान्यवर पाहुणे आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे स्वागत केले. मा. आंबेकर व मा. सानप यांचा संस्थेच्या वतीने अँड. प्रकाश बी. पाटील यांनी सत्कार केला. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

तदनंतर महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिया मोटवानी, प्रतीक्षा मराठे, दुर्वेश मराठे यांना सुवर्ण पदक प्राप्त झाल्याबद्दल तर प्रियंका चव्हाण व मेघा दुज्जूका यांचा न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी निरंजन ढाके आणि कु. सुजाता वाघोडे यांनी केले तर डॉ. डी. आर. क्षीरसागर यांनी आभार मानले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

“ध्येय व यश प्राप्ती साठी गरीबी अडसर ठरत नाही”-उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे

Next Post

बुद्ध विहार कोनशिला अनावरण व भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन

Next Post
बुद्ध विहार कोनशिला अनावरण व भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन

बुद्ध विहार कोनशिला अनावरण व भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d