Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन)/ कोणासही औषंधाची विक्री करु नये-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन)/  कोणासही औषंधाची विक्री करु नये-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
  • जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 – वारंवार सुचना आदेश निर्गमित करुनही जिल्ह्यातील नागरीक/व्यक्ती औषधे, गोळ्या खरेदी करण्याचा बहाणा करुन अनावश्यकरीत्या रस्त्यांवर फिरतांना आढळून येत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व औषधी दुकाने/फार्मसी केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी प्रामुख्याने औषधांची घरपोच सेवा/सुविधा (होम डिलीव्हरी) देण्यावर भर द्यावा. सर्व औषधी दुकाने/फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन) कोणासही औषंधाची विक्री करु नये. संबधित औषध विक्रेत्यांनी ग्राहकांस औषध विक्री केल्यानंतर डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांच्या प्रिस्क्रीप्शनवर औषध दिल्याबाबतचे (डिलीव्हर्ड) शिक्का मारावा. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे. या बाबतीत कोणत्याही औषधी दुकाने/फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी उपरोक्त नमूद तरतूदींचे उल्लंघन केल्यास संबंधित क्षेत्रातील औषध निरीक्षक यांनी संबंधितांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सर्व नागरीक/व्यक्ती यांनी देखील अनावश्यकरीत्या औषधे/गोळ्या यांचा बहाणा करुन रस्त्यावर फिरणे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारिप भडगांव ता.अध्यक्षांनी घरीच केले डाँ बाबासाहेबांना अभिवादन

Next Post

जीवनावश्यक वस्तु पुरवणाऱ्या सेवांसाठी नागरी भागात 11 ते 5 पर्यंतची वेळ निश्चित

Next Post
जीवनावश्यक वस्तु पुरवणाऱ्या सेवांसाठी  नागरी भागात 11 ते 5 पर्यंतची वेळ निश्चित

जीवनावश्यक वस्तु पुरवणाऱ्या सेवांसाठी नागरी भागात 11 ते 5 पर्यंतची वेळ निश्चित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d