Saturday, March 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा -राष्ट्रीय किसान मोर्चा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा -राष्ट्रीय किसान मोर्चा

धरणगांव(प्रतिनिधी)- आज दि. १६ सप्टेंबर २०२१ गुरूवार रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी – देशाच्या पोशिंद्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर हून राष्ट्रीय किसान मोर्चा चे हे आजचे आंदोलन भारतातील ५६० जिल्ह्यात देशव्यापी आंदोलन करण्यात आले. धरणगावात रॅलीची सुरवात छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून झाली व तहसिल कार्यालय येथे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील शेतकरी वाल्मीक पाटील, गोरख देशमुख, लक्ष्मण पाटील, निंबा कुंभार, भागवत चौधरी, भुषण माळी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. बहुजन महापुरुषांचा म्हणजेच शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून रॅली सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये कोरोना नियमांचे पालन करून शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणा दिल्या. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याच्या विरोधातील काळे कायदे रद्द करा, शेतकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या !… अशा विविध घोषणा देत उड्डाणपुलावरून तहसिल कार्यालयापर्यंत शांततापूर्वक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिल कार्यालयाचे तहसिलदार नितीनकुमार देवरे साहेब यांना सादर केले. आमच्या समस्या या देशाचे महामहीम राष्ट्रपती यांच्यापर्यंत आपल्या मार्फत या सर्व मागण्या पोहोच कराव्यात अशी विनंती शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी केली. याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक – आबासाहेब राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष – गोरख देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार यांनी विविध घोषणा दिल्या.राष्ट्रीय किसान मोर्चाच्या रॅलीला पोलीस प्रशासनाने सहकार्य लाभले, यामध्ये मिलिंद सोनार, वैभव बाविस्कर,पोहेकॉ. विनोद संदानशिव, पोहेकॉ. बाळासाहेब बडगुजर यांनी मोलाचे सहकार्य केले.

याप्रसंगी वाल्मीक पाटील (बाभळे), महेंद्र भोई, रामचंद्र पाटील, भागवत चौधरी, जितेंद्र चौधरी, श्रीकांत पाटील, प्रल्हाद महाजन ( मोठा माळीवाडा ), अरविंद चौधरी, अरुण पाटील, अरविंद पाटील, विजय पाटील, भुषण माळी, चत्रु मराठे, गोपाल चौधरी, दिगंबर पाटील, गोपाल चौधरी, रविंद्र गजरे, दिनेश पाटील ( पत्रकार ), शामराव महाजन, दीपक मराठे, शरद गांगापुरी, भाऊसाहेब महाजन (विवरे), राजुभाऊ पाटील (गंगापुरी), ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य व बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, भारत मुक्ती मोर्चा चे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, महात्मा फुले हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार व धरणगाव शहरा तसेच ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा तसेच धरणगाव शहर आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले व परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

चिंचोली येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d