Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती द्यावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती द्यावी

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

चंद्रपूर दि. ११ : कोरोना संक्रमण काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह संक्रमितांची संख्या वाढत आहे. तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या नागरिकाची माहिती वेळेत मिळावी, त्या संदर्भातील निर्णय वेळेत व्हावा, याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

Maha Info Corona Website

सिंदेवाही येथील तहसील कार्यालयामध्ये त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी इंदूरकर, नगरपंचायत सिंदेवाहीच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, सिंदेवाही तालुका आरोग्य अधिकारी ललित पटले, जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे, उपनगराध्यक्ष स्वप्निल काळे, पंचायत समिती सदस्य राहुल पोरेड्डीवार आदींची उपस्थिती होती.

सिंदेवाही तालुक्यामध्ये सध्या फक्त दोन पॉझिटिव्ह संक्रमितांची नोंद आहे. मात्र बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या आरोग्य यंत्रणेचा देखील यावेळी पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. चंद्रपूर येथे कोरोना प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. याही पुढे जाऊन आता लवकरच चाचणी अहवाल कळेल, अशा पद्धतीची यंत्रणा जिल्हास्तरावर विकसित केली जात आहे. त्यामुळे अलगीकरण, विलगीकरण करण्यात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या चाचण्या पुढील काळात घ्यायच्या आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर असावे व आपले मनुष्यबळ तयार करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

नगरपंचायत सिंदेवाही यांच्यामार्फत सुरू असलेल्या स्वच्छता व अन्य पूरक व्यवस्थेबद्दलची माहिती त्यांनी घेतली. याशिवाय त्यांनी पालकमंत्री पांदन रस्त्याबाबत आढावा घेतला. संपूर्ण तालुक्यांमधील बारमाही रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जावे व कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा असू नये, याबाबत दक्ष असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. १४ व्या वित्त आयोगातील कामाचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. याशिवाय राज्य शासनाच्या विविध योजना संदर्भात तालुका स्तरावर सुरू असलेल्या उपाययोजना व गरीब, गरजूंसाठी असणाऱ्या लाभार्थ्यांच्या योजनाबाबत माहिती जाणून घेतली.

संजय गांधी निराधार योजना सारख्या लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळेल, यासाठी तालुक्यातील सर्व बँकांना देखील अवगत करावे, त्यांच्या व्यवस्थापकांना तशा सूचना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. पेरणीच्या दिवसांमध्ये कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने भरारी पथकांच्या मार्फत विशेष दक्षता, घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून द्यावा

Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून द्यावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून द्यावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo