Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव येथे राज्यस्तरीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या गट व समूह समन्वयक कर्मचारी मेळाव्यात प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी – अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचार्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचारी यांना १३ हजाराहून २५ हजार मानधन वाढ करण्यात आली त्याच प्रमाणे तुमचा वकील म्हणून राज्यातील ६१४ गट व समूह समन्वयक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत (तुम्हाला) न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. विभागाच्या गट व समूह कर्मचाऱ्यांनी असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी मानधन वाढ केल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना यांची आज जळगाव येथे वार्षिक राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास निकम व राज्य सचिव, जयंत वर्मा तसेच राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव आणि सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्ह्याच्या वतीने श्री.जितेंद्र महाजन व शिरीष तायडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रास्ताविक राज्यध्यक्ष श्री. विलास निकम यांनी केले आणि आभार जिल्हाध्यक्ष सौ.सपना राजपूत यांनी मानले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणारे सर्व योजना व उपक्रम हे गावपातळीवर यशस्वी पणे राबविण्याचे काम हे सर्व गट समन्वयक, समुह समन्वयक यांनी सक्षमपणे काम करून विभागाचे नावलौकिक वाढवावा. येणाऱ्या काही दिवसात आपण सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात येईल. आणि राज्यातील सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी मी मंत्री म्हणून नाही तर तुमचा वकील म्हणून भूमिका बजावणार असून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले, यावेळी सर्व कर्मचाऱ्या मध्ये उत्सवाचे वातावरण होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीत रसिक चिंब

Next Post

तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाना तर्फे लोहारा येथे वृक्षरोपण

Next Post
तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाना तर्फे लोहारा येथे वृक्षरोपण

तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाना तर्फे लोहारा येथे वृक्षरोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo