Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाथ फाऊंडेशनने भागविली दीड लाख गरजूंची भूक;अन्नछत्र भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडून कौतुक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नाथ फाऊंडेशनने भागविली दीड लाख गरजूंची भूक;अन्नछत्र भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडून कौतुक

जळगाव, ३ मे


राज्यातील कोरोणा च्या पार्श्वभूमिवर २३ मार्चपासून येथील लाडवंजारी मंगलकार्यालयात माजी महसूल-कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गोरगरीब व परप्रांतीय मजुरांकरांना दोन वेळेचे जेवण मिळाव म्हणुन अन्नछत्र उभारण्यात आले आहे. अन्नछत्र उपक्रमाद्वारे आतापर्यंत एक लाख ४० हजार गरजुंची भूक भागविली आहे.


दरम्यान, ३ मे रोजी ज्येष्ठ एकनाथराव खडसे यांनी लाडवंजारी मंगलकार्यालयात उभारण्यात आलेल्या अन्नछत्राला भेट देऊन नाथ फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य त्या काळजी घेऊन आपण हे कार्य उत्तमरीत्या पार पाडत असल्याने समाधान वाटले. वडीलधारी व्यक्ती म्हणुन तुमच्या सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आपणा सर्वांना भेटण्याकरता इथे आल्याचे सांगितले. तसेच स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात सूचना देखील दिल्या.


यावेळी नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, सुनिल माळी, डॉ.अभिषेक ठाकुर, लोकेश मराठे, गणेश चौव्हाण, नितिन महाजन, धिरज काबरा, योगेश लाडवंजारी, रीतेश लाडवंजारी, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी सचिन माळी, तलाठी रमेश वंजारी, मिलिंद लोणारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्नछत्राच्या माध्यमातून गेल्या ४० दिवसांपासून शहरातील सुप्रीम कॉलनी, पंचशील नगर, खेडी, लक्ष्मीनगर, समतानगर, उजाड कुसुंबा, तट्याभील सोसायटी, पिंप्राळा, तांबापूर गवळी वाडा, शिवाजी नगर, इच्छादेवी नगर परीसरातील गोरगरिबांना रोज सकाळ-संध्याकाळी सुमारे २५०० ते ३००० अन्नाचे पॉकीट घरपोच वाटप करण्यात येत आहे. तसेच ४० दिवसांच्या कालावधीत हनुमान जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया सारख्या सणांच्या दिवशी गोड पदार्थ या पॉकीटमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. जेणेकरुन गरिबांना देखील आपले सण साजरे करता आल्याच मानसिक समाधान होईल, हे विशेष
.

यांचे लाभले सहकार्य

नाथ फाउंडेशन, संत गोदडीवाले बाबा हरदास सेवा मंडळ, जैन इरिगेशन,  शिवसह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद, रतनलाल सी. बाफना गोशाळा, हितेश प्लास्टिक जळगाव, साई संस्थान पाळधी, नव युवक अग्रवाल समाज मंडळ, माहेश्वरी समाज मित्र मंडळ, गिरीश पाल, स्वामी समर्थ सेवा मंडळ, नशिराबाद, प्रेमराज कलंत्री, समस्त लाडवंजारी मंगल कार्यालय व जळगाव शहरातील दानशूर मंडळींच या मदतकार्यास सहकार्य लाभत आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीला नाथ फाउंडेशनच्या वतीने चौका चौकांवर बंदोबस्ताकरीता असलेल्या पोलिसांना व रस्त्यावरील गोरगरीब लोकांना बिस्लेरी पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले.  तसेच शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ८००० मास्कचे वाटप केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोऱ्यात वृद्ध महिलेच्या अंत्यविधी करीता स्थानिक प्रशासनासह NYK च्या स्वयंसेवकांचा पुढाकार

Next Post

कृती फाऊंडेशनच्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला ७ क्विंटल धान्याची मदत

Next Post
कृती फाऊंडेशनच्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला ७ क्विंटल धान्याची मदत

कृती फाऊंडेशनच्या वतीने रेडक्रॉस कम्युनिटी किचनला ७ क्विंटल धान्याची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d