Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेशन बिल्डर अवार्ड ने शिक्षक सन्मानित;रोटरी क्लब व मनपा केंद्र क्र.९ अंतर्गत पहिला उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2020
in विशेष, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – शिक्षक सदैव आपल्या कार्याने देशाच्या विकासास योगदान देत असतात यामध्ये ज्या शिक्षकांनी आपल्या स्वतःचे जीवन विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले व सदैव त्यांच्या विकासाची कास धरली अशा गुणवंत व कर्तृत्ववाण शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन प्रथमतः च मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 चे केंद्रप्रमुख डॉ.अशोक सैंदाणे यांनी त्यांच्या केंद्रा अंतर्गत असलेल्या शाळेतील शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्ड देऊन सन्मान केला.
        सदर पुरस्कार समारंभ रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आला.त्यात निलेश रामराव मोरे (त्र्यंबक नगर प्रा.विद्या.) , किशोर मनोहर राजे (भगीरथ इंग्लिश स्कुल) ,चेतना चंद्रकांत महाजन (  बाहेती प्रा.विद्या.) , उज्ज्वला सतीष जाधव ( कमलाबाई वाणी बालनिकेतन विद्या.) ,तनुजा हरिष तळेले (शेवंताबाई खेमा टोके प्रा.विद्या.) ,इंदिरा रमेशचंद्र अहिरराव (मनपा केंद्र शाळा क्रमांक 38 ) , नंदू यशवंत खरे ( शारदा प्रा.विद्या.) , प्रकाश मोतीराम खैरनार ( नूतन मराठा माध्य.विद्या) ,अशोक सोनू पारधे (भगीरथ इंग्लिश स्कुल) , सुरेखा विश्वास भदाणे (आदर्श अध्यापन सराव पाठशाळा) यांना  उपशिक्षणाधिकारी डी. एम.देवांग यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आपण खऱ्या अर्थाने शासनाचे , शाळेचे व विशेषतः विद्यार्थ्यांचे सेवक असून आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवून काम करावे.प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा महत्वाचा घटक आहे.आपण भाग्यवान आहोत की आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळाली.त्यातून आपण खरी देशसेवा करू शकतो.अशा शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ.डी. एम.देवांग यांनी आपले विचार व्यक्त केले.
      त्याचप्रमाणे जळगाव शिक्षक कलामंच तर्फे योगेश भालेराव , मानव भालेराव व निलेश मोरे यांनी या प्रसंगी सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर केला.
प्रसंगी डॉ. तुषार फिरके( असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब झोन 12) , संजय दहाड (अध्यक्ष रोटरी क्लब) , राहुल कोठारी ( सेक्रेटरी गोल्ड सिटी) ,श्याम ठाकरे ( कार्याध्यक्ष खा.प्रा.शिक्षक शिक्षकेतर महासंघ जळगाव जिल्हा ) , गोविंदा लोखंडे ( अध्यक्ष खा.प्रा.शिक्षक शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुका ) , अजित चौधरी ( सचिव खा.प्रा.शिक्षक शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुका ) सर्व रोटरिअन तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रपुरुषांशी तुलना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमीत शहा यांचा जाहिर निषेध;जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo