Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकारांना मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पत्रकारांना मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हेल्मेट वाटप

स्तुत्य उपक्रम ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा थाटात साजरा

पाचोरा, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आयोजित पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप, रक्तदान शिबिर आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते दिनांक 10 रोजी देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजित या कार्यक्रमांस राज्याचे नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणआबा पाटील,किरकिस्थान देशाचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी,पत्रकार संघांचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते डॉ.भूषण मगर डॉ.स्वप्नील पाटील यांचेसह पाचोरा,भडगाव, चाळीसगाव, कासोदा, एरंडोल येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दोन सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे होते.

रक्तदान शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४५ पत्रकार बांधवांनी रक्तदान करत एक वेगळा आदर्श निर्माण केला. विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते,जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुलकर्णी, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, पत्रकार संघांचे ग्रामीण जिल्हा कार्यध्यक्ष दिपक सपकाळे, जळगाव महानगर अध्यक्ष कमलेश देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले तर पत्रकार संघाच्या विविध तालुका पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर रायसाकडा यांनी केले.

सदैव पत्रकारांच्या पाठीशी आहोत – विश्वासराव आरोटे

पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये काम सुरु असून चांद्या पासून तर बांद्या पर्यंत संघटनेचे जाळे पसरले असून प्रत्येक वेळी पत्रकारांच्या पाठीशी संघटना खंबीर पणे उभी राहते, पत्रकारांच्या सुख दुःखात नेहमीच उभी राहते. जळगाव जिल्हायात संघटनेचे काम उल्लेखनीय असून यापुढेही असेच सामाजिक उपक्रम रबाविले जातील असल्याचे विश्वास आरोटे यांनी अध्यक्षीय भाषणात संगीतलं.

यापुढेही पत्रकार हिताचे उपक्रम राबवू – प्रविण सपकाळे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या न्याय हक्का साठी तत्पर राहणारी संघटना आहे. पत्रकारांचे हित जोपासनं व पत्रकार बांधवांच्या कल्यानाचे उपक्रम राबविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असू, यापुढेही पत्रकार बांधवांसाठी पत्रकार हिताचे उपक्रम राबविले जातील असे उपस्थित पत्रकार बांधवाना अश्वस्थ केले.

सत्काराला उत्तर देत डॉ भूषण मगर, देवेंद्र साळी,एस. आर.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याशिवाय कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य आणि गौरी बारी यांनी केले तर आभार शांताराम चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सी. एन.चौधरी, गणेश रावळ, संजय चौधरी, विलास ताठे,महेंद्र सूर्यवंशी,चेतन निबोळकर,अनिल येवले, भगवान मराठे,, गोपाल सोनवणे विनोद कोळी, अबरार मिझाॅ, अनिल येवले, निलेश मराठे, चेतन महाजन आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शाळा सुरु करण्यासाठी इंग्रजी शाळांना देखभाल दुरुस्ती अनुदान द्या : मेस्टा जिल्हाध्यक्ष इंजि. नरेश पी. चौधरी यांची मागणी

Next Post

भडगाव तालुक्यातील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार

Next Post
भडगाव तालुक्यातील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार

भडगाव तालुक्यातील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo