Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पदोन्नती मधील ३३ टक्के आरक्षण कायम ठेवावे; आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पदोन्नती मधील ३३ टक्के आरक्षण कायम ठेवावे; आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निम्मीताने आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभर एकाच वेळी मा. मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा कृती समितीच्या वतीने पदोन्नती मधील ३३ टक्के आरक्षण कायम ठेवण्याबाबत निवेदन देऊन शासनाने नियुक्ती केलेल्या मंत्रिगट समितीने मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षण प्रभावीत होत असून त्यामुळे हक्क, अधिकार नाकारला जातं आहे.

मा. न्यायालयाचे कुठल्याही प्रकारे आदेश व सुचना नसताना मा. न्यायालयाचे नाव पुढे करुन शासन मागासवर्गीयांचे नोकरीमधील पदोन्नतील आरक्षण जाणीवपूर्वक नाकारत आहे. तरी ७ मे २०२१ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत आरक्षण हक्क कृती समिती जिल्हा जळगांव यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.सदर राज्यव्यापी आंदोलनास आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्या चे सुनील गायकवाड, रुचिता मोरे, करण सोनवणे यांनी पत्र देऊन पाठिंबा दिलेला आहे.

सदर मागणी वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स(बाणाई) चे जिल्हाध्यक्ष आर. जे. सुरवाडे, सुशांत मेढे, मनोहर तायडे, आर.बी. निकम, यु. डी. बोडदे, एस.पी. लोखंडे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे प्रकाश वसावे, प्रदीप बारेला, ओंकार भिलाला, विजय चव्हाण, उमवी मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे जयंत सोनवणे, राजू सोनवणे, अरुण सपकाळे, विकास बिऱ्हाडे, सुभाष पवार, सुनील सपकाळे, मुल निवासी संघाचे रमेश साळवे, धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे मनोज मोरे, बामसेफ चे विद्याधर भालेराव, जय भालेराव, मुल निवासी संघटनेचे मिलिंद बाविस्कर, श्रावण बाविस्कर, जगदीश सपकाळे, भारतीय बौद्ध महासभेचे अमोल वाघमारे आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बोदवड ला भाजपा चे ‘चक्काजाम आंदोलन’

Next Post

भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना सेल्फी द्वारे शुभेच्छा

Next Post
भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना सेल्फी द्वारे शुभेच्छा

भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंना सेल्फी द्वारे शुभेच्छा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo